Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीचे, खाजगी संवर्गातील वाहनांच्या नोंदणीचे शिबिर रद्द
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्रावण कुमार - प्रतिनिधी चंद्रपूर - उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने मुल, ब्रह्मपुरी व गडचांदूर येथे शिकाऊ अनुज्ञप्त...

श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने मुल, ब्रह्मपुरी व गडचांदूर येथे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्क्या अनुज्ञप्तीचे, खाजगी संवर्गातील वाहनांची नोंदणी इत्यादी कामांविषयी शिबिर रद्द करण्यात आले आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक जाधव यांनी केले आहे.

मुल येथील कर्मवीर महाविद्यालय येथे 15 ऑक्टोंबर रोजी शिबिर आयोजित केले होते मात्र त्याठिकाणी कोविड सेंटर असल्यामुळे शिबिर रद्द करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे एन.एच महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे 22 ऑक्टोंबर रोजी होणारे शिबिर महाविद्यालय परीक्षा केंद्र असल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. तर शरद पवार महाविद्यालय गडचांदूर येथे 29 ऑक्टोंबर रोजी आयोजित केले होते मात्र याठिकाणी कोविड सेंटर असल्यामुळे सदर शिबिर रद्द करण्यात आले आहे. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top