Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जातीचे पुरावे व मुळ दस्ताऐवज सादर केले नसल्याने 129 जात वैधता प्रमाणपत्र रद्द
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बघा सविस्तर कोण-कोणत्या क्रमांकाचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे.... श्रावण कुमार - प्रतिनिधी चंद्रपूर - 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्...

  • बघा सविस्तर कोण-कोणत्या क्रमांकाचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे....
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -

30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीत निर्गमित केलेले 129 जात वैधता प्रमाणपत्र  रद्द ठरविण्यात आल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त विजय वाकुलकर यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या तत्कालीन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती चंद्रपुर कडून 30 जुलै 2011 ते 31 ऑगस्ट 2012 या कालावधीमध्ये काही उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. अशा वैधता प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने सिविल अपील क्रमांक 2723 व 2015 नुसार दिलेले आहे.

वैधता प्रमाणपत्र धारकांना मुळ जात प्रमाणपत्र, मुळ जात वैधता प्रमाणपत्र, अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला, वडीलांचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच जातीदावा सिध्द करणारे जातीचे व चंद्रपूर जिल्ह्यातील अधिवासाबाबतचे महसूली पुरावे (अनुसूचित जातीसाठी सन 1950 पुर्वीचे, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी 1961 पुर्वीचे, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या उमेदवाराकरीता 1967 पुर्वीचे पुरावे) इत्यादी मुळ दस्ताऐवज व छायांकीत प्रतीसह उपस्थित राहण्याबाबात कळविण्यात आलेले होते.

परंतू, अद्यापही उमेदवारांकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचे यापुर्वी निर्गमीत केलेले जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरविण्यात आले आहे.

रद्द करण्यात आलेले या क्रमांकाचे जात वैधता प्रमाणपत्र :
7453, 6902, 6927, 6948, 6989, 6597, 6599, 6595, 6909, 6921, 6553, 6944, 7460, 6959, 6949, 6564,  6561, 6570,6574, 6905, 6554, 7488,‌ 6973, 6560, 6559, 7498, 6912, 6565, 6990, 6995, 6996, 6946, 6578, 7456, 7499, 6991, 6026, 6032, 6042, 7604, 7612, 7630, 7631, 7639, 7640, 7642, 7643, 6125, 6131, 6051, 6053, 6055, 6060, 6062, 6063, 6078, 7468, 7901, 7902, 7906, 7908, 7601, 6087, 6018, 6113, 6143, 7910, 6006, 6008, 6012, 6014, 6016, 6019, 6035, 6040, 7602, 7618, 7625, 7634, 7644, 6106, 6110, 6112, 6116, 6118, 6137, 6146, 6149, 6075, 6079, 6080, 6081, 6089, 6093, 7474, 7476, 7903, 7304, 7912, 7455, 6932, 7480, 6953, 6936, 6005, 6940, 6941, 6102, 7457, 7482, 6977, 6589, 6978, 6551, 6566, 6951, 6916, 6594, 6934, 7486, 7454, 6904, 6915, 6931, 7497, 6943, 7479, 6988, 6930 या क्रमांकाचे जात वैधता प्रमाणपत्राचा वापर कुठल्याच शासकीय कामाकरीता ग्राह्य धरु नये, असे आवाहन समितीचे उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top