Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मॉर्निंग वॉक दरम्यान ट्रकच्या धडकेत मृत्यू झालेल्या युवकांच्या कुटूंबियांचे पालकमंत्री यांच्याकडून सांत्वन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुख्यमंत्री सहायता निधीतून 2 लक्ष रुपये देण्याची ग्वाही श्रावण कुमार - प्रतिनिधी चंद्रपूर - खरकाडा ते आरमोरी मार्गावर सकाळी मॉर्निंग वॉकला ग...

  • मुख्यमंत्री सहायता निधीतून 2 लक्ष रुपये देण्याची ग्वाही
श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -
खरकाडा ते आरमोरी मार्गावर सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन युवकांचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. या युवकांच्या घरी भेट देऊन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले.

खरकाडा गावातील प्रशांत सहारे व रोहित चट्टे हे मित्र  रोज सकाळी साडेचार वाजता खरकाडा -आरमोरी रस्त्यावर व्यायाम आणि मॉर्निंग वॉकला जात होते. 9 ऑक्टोबरला सुद्धा ते सकाळी व्यायाम करण्यासाठी गेले असता एका ट्रकने त्यांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. तरुण मुलांच्या अशा अपघाती निधनाने कुटुंबियांवर शोककळा पसरली.  पालकमंत्र्यानी आज त्यांच्या ब्रह्मपुरी दौऱ्यादरम्यान या दोन्ही युवकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच मुख्यमंत्र्यांना विनंती करून  मुख्यमंत्री सहायता निधीतून कुटुंबियांना 2 लाख रुपये सानुग्रह मदत देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top