Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: आठवडी बाजार सुरू करण्‍यासाठी त्‍वरीत परवानगी दयावी – आ. सुधीर मुनगंटीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लवकरच आठवडी बाजार सुरू होतील - मदतकार्य व पुनर्वसन विभागाच्‍या सचिवांचे आश्‍वासन मनोज सोगलकर -विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - राज्‍यात कोरोना विष...

  • लवकरच आठवडी बाजार सुरू होतील - मदतकार्य व पुनर्वसन विभागाच्‍या सचिवांचे आश्‍वासन
मनोज सोगलकर -विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -

राज्‍यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्‍यानंतर लागु करण्‍यात आलेल्‍या लॉकडाउन पासुन आठवडी बाजार बंद करण्‍यात आले आहेत. राज्‍यात टप्‍याटप्‍याने अनलॉक सुरू झाल्‍यानंतर अद्याप आठवडी बाजार मात्र सुरू करण्‍यात आलेले नाही. त्‍यामुळे आठवडी बाजारावर ज्‍यांचा उदरनिर्वाह‍ अवलंबुन आहे अशा छोटया – मोठया व्‍यावसायीकांचा व्‍यवसाय बंद असल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. ही बाब लक्षात घेता त्‍वरीत आठवडी बाजार सुरू करण्‍यासाठी परवानगी देण्‍यात यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्‍य शासनाकडे केली आहे. यासंदर्भात त्‍यांनी मदतकार्य व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्‍याशी चर्चा केली असुन लवकरच आठवडी बाजार सुरू करण्‍यात येतील असे आश्‍वासन निबांळकर यांनी आ. मुनगंटीवार यांना दिलेले आहे.

राज्‍यात टप्‍याटप्‍याने अनलॉक सुरू झाल्‍यानंतर हॉटेल्‍स, मॉल्‍स, मदीरालये आदींना परवानगी देण्‍यात आली आहे. परंतु ग्रामीण तसेच निमशहरी भागातील नागरिकांसाठी अतिशय जिव्‍हाळयाचा समजला जाणारा आठवडी बाजार मात्र अद्याप सुरू झालेला नाही. 6 महिन्‍यांचा कालावधी लोटुनही अद्याप आठवडी बाजार बंद असल्‍यामुळे यावर अवलंबुन असलेल्‍या व्‍यावसायीकांना व्‍यवसायाअभावी आर्थीक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. त्‍याचप्रमाणे नागरिकांना सुध्‍दा गैरसोय सहन करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता आठवडी बाजार सुरू करण्‍याबाबत त्‍वरीत निर्णय घेण्‍याची आवश्‍यकता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केली आहे. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top