Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा येथे 50 खाटांचे स्वतंत्र कोरोना केंद्र आजपासून सुरू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आज रुग्णालयाचे उद्घाटन अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य...

  • लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आज रुग्णालयाचे उद्घाटन
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे स्वतंत्र कोविड काळजी केंद्र सुरू करण्यात आले आहे. लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आज रुग्णालयाचे उद्घाटन पार पडले. कोविड रुग्णांमध्ये ऑक्सिजन पल्स रेट 90 पर्यंत खाली आलेल्या रुग्णांवर या केंद्रामध्ये उपचार केले जाणार आहेत.
राजुरा तालुक्यातील कोविड रुग्णांना योग्य उपचार मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे स्वतंत्र कोविड काळजी केंद्र सुरू करण्यात आले आहे. आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आज (शुक्रवार) रुग्णालयाचे उद्घाटन पार पडले. 50 खाट असलेल्या या कोविड केंद्राचा रुग्णांना लाभ होणार आहे.
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण वाढला आहे. कोविड उपचारासाठी प्रत्येक रुग्णांना चंद्रपूरला पाठवले जाते. त्यामुळे राजुरा येथे उपजिल्हा रुग्णालय इमारत पूर्ण झाल्यानंतर येथे सुविधा देण्याची मागणी नागरिकांनी केली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत आमदार सुभाष धोटे यांनी स्वतंत्र कोविड काळजी केंद्र राजुरा येथे सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून आज उपजिल्हा रुग्णालय, राजुरा येथे या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे आजपासून 50 खाटांचे रुग्णालय कोविड रुग्णांच्या सेवेत रुजू झाले आहे. कोविड रुग्णांमध्ये ऑक्सिजन पल्स रेट 90 पर्यंत खाली आलेल्या रुग्णांवर या केंद्रामध्ये उपचार केले जाणार आहेत. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर लहू कुडमेथे, डॉक्टर बांबोळे, डॉक्टर अशोक जाधव, डॉक्टर अमित चिद्धमवार, डॉक्टर डाखोळे, डॉक्टर अनिता आरके, डॉक्टर शेख, डॉक्टर स्नेहल डाहुले, या केंद्राचे प्रमुख डॉक्टर विवेक लांजेकर आणि आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top