Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूर नगर परिषदे समोर अन्नत्याग उपोषण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
घनकचरा घोटाळा प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी उपोषणाच्या चौथ्या दिवशीही प्रशासनाचे दुर्लक्ष उ...
  • घनकचरा घोटाळा प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
  • उपोषणाच्या चौथ्या दिवशीही प्रशासनाचे दुर्लक्ष
  • उपोषणकर्ता बोरकर यांची प्रकृती खालावली
  • मागणीची पूर्तता न झाल्यास येत्या दोन दिवसात समर्थकांकडून रास्तारोको आंदोलनाचा इशारा
  • आज माजी आमदार एड. संजय धोटे व राजुरा व्यापारी एसो. चे अध्यक्ष तथा नगरसेवक राधेश्याम अडानिया यांनी घेतली उपोषणकर्त्याची भेट

सुरज लेडांगे - प्रतिनिधी
गडचांदूर -
गडचांदूर नगरपरिषदेत झालेल्या घनकचरा घोटाळा प्रकरणाची शासनाने त्वरित उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित नगरपरिषद दोषी अधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी घनकचरा कंत्राटदारांसोबत संगनमत करून लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप करत प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी तसेच संबंधित कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा, या मागणीच्या पुर्ततेकरिता भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी ३० सप्टेंबर पासून गडचांदूर नगरपरिषदेसमोर अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली असून आजचा चौथा दिवस आहे. बोरकर यांच्या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दर्शविला असून उपोषणाच्या आज चौथ्या दिवशीही प्रशासनाने या प्रकरणाची योग्य ती दखल घेतलेली नाही. उपोषणकर्ता बोरकर यांची प्रकृती खालावत असून आज माजी आमदार एड. संजय धोटे व राजुरा व्यापारी एसो. चे अध्यक्ष तथा नगरसेवक राधेश्याम अडानिया यांनी घेतली उपोषणकर्त्याची भेट घेतली. तसेच अनेकांनी उपोषण मंडपाला भेट देऊन समर्थन जाहीर केले आहे. तसेच भाजप, शिवसेना, मनसे, आरपीआय (आठवले गट), आरपीआय (कवाडे गट) पदाधिकाऱ्यांनी जाहीर पाठिंबा देत एकदिवसीय उपोषणाला सुरुवात केली आहे. शहरात डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत असतांना  नगर परिषदे कडून नियोजनशून्य कारभार सुरू आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा येत्या दोन दिवसात रास्तारोको आंदोलन करू अशी भूमिका सर्व समर्थकांकडून केली जात आहे.







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top