Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: एशान लढी ने केला वृक्षारोपनाने वाढदिवस साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वडिलांच्या कार्याची मुलाकडुन दखल नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे संस्कार वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी राजुरा - लहान मूल म्हण...

  • वडिलांच्या कार्याची मुलाकडुन दखल
  • नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे संस्कार
वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी
राजुरा -

लहान मूल म्हणजे मोठ्याव्यक्तीचे हुबेहुब अनुकरण करतात. मुळात लहान मुलांना मोठ्या व्यक्तीचे अनुकरण करण्याची जणूकाही सवयच झाली आहे. त्यामुळे बालवयातच आपण आई -वडील म्हणून किंवा कुटुंबातील मोठे व्यक्ति म्हणून बालमनावर कोणते संस्कार करतो ,त्यांच्यासमोर काय कार्य करतो यावर मुलांचे निरीक्षण असते. ते कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे मुलांच्या क्रुतीतून व्यक्त होते.

राजुरा येथील इन्फंट् जीजस इंग्लिश पब्लिक स्कूल मधे इयत्ता सहावी मधे शिकणारा एशान उमेश लढी. वडील शिक्षकी पेशात असून ते नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राजुरा शहर संघटक म्हणूनही सामाजिक कार्य करतात. आपल्या वडिलांचे व त्यांच्या सहकार्यांचे कार्य बघून एशानने व्रूक्षारोपन करून वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प केला. त्याने आपल्या परिसरातील प्राचीन असे सोमेश्वर मंदिर येथे आपल्या बालमित्रांनासोबत घेऊन व्रुक्षारोपन केले. यावेळी नेफडो चे विभाग सचिव बादल बेले यांनी एशान ला वाढदिवसानिमित्त भेटवस्तु देऊन त्याच्या या कार्याचे कौतुकही केले. उमेश लढी, आर्यन सुरेश लढी, दीपीका राजू  देशमुख , रश्मि रामू देशमुख आदींची उपस्थिति होती. कोरोणासारख्या जागतिक संकटात मनात भीती न बाळगता पर्यावरणाच्या संवर्धन व संरक्षणाकरीता नेफडो चे कार्यकर्ते कार्यरत आहेत. आज सर्वांना ऑक्सिजन ची किंमत त्याचे महत्व कळायला लागले आहे. ऑक्सिजन अभावी हजारो नागरिकांचा जीव जात आहे. अश्यातच शासनाच्या नियमांचे पालन करीत संपूर्ण महाराष्ट्रत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे कार्य अविरतपणे सुरू आहे. त्याची दखल एशान सारखे अनेक बालगोपाल विध्यार्थी घेत आहेत. 













About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top