Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चार बाधितांचा मृत्यू
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
24 तासात नव्या 274 बाधितांची नोंद 3345 वर उपचार सुरु 4627 कोरोनातून बरे चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 8090 चंद्रपूर जिल्हा कोरोना अप...

  • 24 तासात नव्या 274 बाधितांची नोंद
  • 3345 वर उपचार सुरु
  • 4627 कोरोनातून बरे
  • चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 8090
  • चंद्रपूर जिल्हा कोरोना अपडेट्स
  • वाचा सविस्तर....
श्रावण कुमार - प्रतिनिधी 
चंद्रपूर -
आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 274 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 8 हजार 90 वर पोहोचली आहे. यापैकी 4 हजार 627 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 345 बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात  24 तासात चार बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये, दुर्गापुर, चंद्रपूर येथील 83 वर्षीय महिला बाधितेचा समावेश आहे. या बाधितेला 14 सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 

दुसरा मृत्यू महाराणा प्रताप वार्ड, बल्लारपूर येथील 65 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू घुग्घुस, चंद्रपुर येथील 43 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 

तर, चवथा मृत्यू  श्रीराम वार्ड, बल्लारपूर येथील 78 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 20 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. वरील चार मृत्यू असून कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 118 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 111, तेलंगाणा 1, बुलडाणा 1, गडचिरोली 2, यवतमाळ 3 बाधितांचा समावेश आहे

24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 172 बाधित, पोंभूर्णा तालुक्यातील 6, मूल तालुक्यातील 8, गोंडपिपरी तालुक्यातील 4, कोरपना तालुक्यातील 11, ब्रह्मपुरी तालुक्यातील 33, नागभीड तालुक्यातील 15, वरोरा तालुक्यातील 1, भद्रावती तालुक्यातील 16, सावली तालुक्यातील 1, सिंदेवाही तालुक्यातील 2, राजुरा तालुक्यातील 4 तर गडचिरोली येथून आलेला 1 असे एकूण 274 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील तुकूम, साईनगर, रामनगर, सिंधी कॉलनी परिसर, दादमहल वार्ड, बाजार वार्ड, ऊर्जानगर, विवेक नगर, गोपाल नगर, अरविंद नगर, बंगाली कॅम्प परिसर, भानापेठ वार्ड, बाबुपेठ, भिवापुर वॉर्ड, वडगाव, शिवनगर, लालपेठ कॉलनी परिसर, शास्त्रीनगर, इंदिरानगर, संजय नगर, घुगुस, लक्ष्मी नगर, समाधी वार्ड, त्रिमुर्ती नगर, मित्र नगर, माता नगर लालपेठ, बापट नगर, भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित: 
ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव, गांधिनगर, कुर्झा, रेणुका माता चौक परिसर, उदापूर , विद्यानगर, नरिम चौक, सुंदर नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील विनायक नगर माजरी, पंचशील नगर, गांधी चौक परिसर, संताजी नगर, बाजार वार्ड , शिंदे कॉलनी परिसर , चैतन्य कॉलनी परिसर माजरी भागातून बाधित ठरले आहे. नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव, चिंधीमाल, परिसरातून बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील माणिकगड कॉलनी परिसर, भवानी मंदिर अमलनाला, हनुमान मंदिर परिसर, गडचांदूर परिसरातून बाधित पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील कनाडगाव भागातून बाधीत ठरले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top