- सृजन नागरिक मंचचा पुढाकार
राजुरा -
'गाव तिथे फळझाडे' या संकल्पनेतून सृजन नागरिक मंच, राजुरा यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आर्वी येथे आज बादाम, फणस, चिकू, शेवगा इ. झाडांचे वृक्षारोपण मुख्याध्यापक अरविंद तामगाडगे, शा.व्य.स. अध्यक्ष बंडु महाकुलकर, सृजन नागरिक मंच चे संयोजक व सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गड्डमवार, कृतिका सोनटक्के, राजु साईनवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शाळेतील आवारात लावलेली झाडे जगविण्याचे आश्र्वासन मुख्याध्यापक तामगाडगे सर यांनी दिले. फळ झाडांचे मानवी जीवनातील महत्त्व व गुणधर्म आज समजायला लागल्याने झाडांची निगा राखणे हे गावकऱ्यांचे सुध्दा कर्तव्यच आहे असे मत शा.व्य.स. अध्यक्ष बंडु महाकुलकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले. गाव तिथे फळझाडे, याउपक्रमाचे आयोजन बहुतांश शाळेत करण्यात यावे अशी आग्रही मागणी मुख्याध्यापक अरविंद तामगाडगे यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.