Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धानावरील तपकिरी तुडतुड्याचे वेळीच व्यवस्थापन करावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कृषी विभागाचे आवाहन मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - सन 2017 मध्ये तुडतुड्यामुळे धान पिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. सिंदेवाही ...

  • कृषी विभागाचे आवाहन
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
सन 2017 मध्ये तुडतुड्यामुळे धान पिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. सिंदेवाही येथील कृषि विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील विविध तालुक्यात सर्वेक्षण केले असता धान पिकावर तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव अत्यंत कमी प्रमाणात आढळून आला. मात्र  तापमान वाढीमुळे अधिक आर्द्रता निर्माण झाल्यास तुडतुडा या किडीचा उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सजग असावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

पिल्ले व प्रौढ तुडतुडे झाडाच्या बुंध्यामधुन व खोडामधुन सतत रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडून झाड निस्तेज होऊन सुकून वाळते. तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव शेताच्या मध्यभागातुन गोलाकार खळ्याप्रमाणे सुरु होऊन शेत जळल्यासारखे दिसते. यालाच ‘हॉपर बर्न’ असे म्हणतात.

अशा कराव्या उपाय योजना:
मेटारायझीयम ॲनिसोपली हे जैविक किटकनाशक 2.5 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बांधीमध्ये वापर करावा. तुडतुड्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडताच नियंत्रणासाठी बुप्रोफेजीन 25 टक्के प्रवाही 16 मिली किंवा इमिडॉक्लोप्रीड 17.8 एसएल 2.2 मिली किंवा फिप्रोनिल 5 एससी 20 मिली किंवा इथोफेनॅप्रॉक्स 10 टक्के प्रवाही 10 मिली किंवा फ्लोनीकॅमीड 50 टक्के 3 ग्रॅम किंवा थायोमिथाक्झाम 25 डब्ल्युजी 2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तपकिरी तुडतुड्यांच्या नियंत्रणासाठी विशेषत: धानाच्या बुंध्यावरील भागावर जेथे तुडतुडे रस शोषण करतात त्या ठिकाणी किटकनाशक फवारणे आवश्यक आहे.

वरील किटकनाशके व बुरशीनाशके प्रमाण हे साध्या पंप (नॅपसॅक स्प्रे) साठी आहे. हे प्रमाण पेट्रोल, पावर पंपासाठी तिप्पट करावे. फवारणी करतांना सुरक्षा किटचा वापर करावा असे आवाहन विभागीय कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी  संशोधन संचालक डॉ. ए. व्हि. कोल्हे, किटकशास्त्रज्ञ प्रा. पि. पि. देशपांडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. व्हि. जी. नागदेवते  यांनी केले आहे.


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top