Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पळसगांव (पिपर्डा) येथे विधवा महिलेला बसला इलेक्ट्रिक बिल चा करंट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विधवा महिलेला दोन खोल्याचं लाईट बिल 65 हजार 520 रुपये महाप्रतापी महावितरण चा महाप्रताप मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चिमूर - चिमुर तालुक्यात...

  • विधवा महिलेला दोन खोल्याचं लाईट बिल 65 हजार 520 रुपये
  • महाप्रतापी महावितरण चा महाप्रताप
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चिमूर -
चिमुर तालुक्यातील पळसगांव (पिपर्डा) संपूर्ण राज्यात महावितरणने पाठविलेल्या वीज बिलामुळे गोंधळ उडाला असतांनाच चिमूर तालुक्‍यातील पळसगांव (पिपर्डा) येथील एका विधवा व मोडक्या घरात राहणाऱ्या महिलेच्या कुटुंबाला तब्बल 65 हजार 520 रुपये इतके बिल महावितरण ने पाठविले आहे. महावितरणाच्या भोंगळपणा उघडकीस आला आहे. विधवा महिलेला दोन खोल्याचं लाईट बिल 65 हजार 520 रु इतका आला आहे. एका गरीब विधवेच्या घरी वीजेची थोडीफार उपकरणं असतानाही तिला हजारो रुपये बिलं पाठवण्यात आली आहे. वनिता उत्तम शिवरकर असे या विधवा महिलेचे नाव असून लॉकडाऊनमुळे हातात कमी पैसे असताना हजारोंच्या घरात आलेली वीज बिलं कशी भरायची? असा प्रश्न या विधवा महिलेस पडला आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता महावितरणने वाढीव वीज बिलांचा शॉक दिला आहे.       

याबाबत वनिता च्या मुलाने महावितरण कार्यालयात खेटेही घातले. वनीताबाई चे घर अवघं दोन खोल्यांचे. त्यांच्या घरात दोन किंवा तीन लाईट आणि एक छोटा टीव्ही. अशा घरात साधारण महिन्याचे लाईट बिल साधारण 500 ते 800 रुपयांपर्यंत येणं अपेक्षित आहे. पण सलग तीन महिन्याचे बिल हे सरासरी प्रमाणे सारखे युनिट जळून 2745 रु प्रमाणे आले होते. एका विधवा कुटुंबावरच अंधारात राहण्याची वेळ आली. महावितरणकडे नाईलाजाने नव्या मीटरची मागणी केली आहे. महावितरणच्या अनागोंदी कारभाराने विधवा महिला संतप्त झाली आहे. वनिताताई कसा न्याय मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top