Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अबब..... ११ वर्षाचा पोराने केले शेतावर अतिक्रमण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वडिलांची जमीन राहूनसुद्धा मुलगा भूमिहीन कसा? खैरगाव (रिठ) येथील शेतीवर अवैध ताबा घेणाऱ्या नेत्याची चौकशी करा आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स ...

  • वडिलांची जमीन राहूनसुद्धा मुलगा भूमिहीन कसा?
  • खैरगाव (रिठ) येथील शेतीवर अवैध ताबा घेणाऱ्या नेत्याची चौकशी करा
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
खैरगाव (रिठ) येथील घुगुल-झाडे शेताचे प्रकरण सध्या खूप गाजत आहे. तुमची जमिन माजी सैनिक यांना बक्षिस देण्यात आल्याची खोटी माहिती देऊन बळजबरीने ताबा घेणाऱ्या हरीदास झाडे आणि तलाठी मेश्राम यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी राजुरा तालुक्यातील माथरा लगतच्या खैरगाव रिठ येथील घुगुल कुटुंबाने राजुरा-चंद्रपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली होती. 

एकीकडे जगाचा पोशिंदा कसे तरी कबाड कष्ट व छोटासा व्यवसाय करून घाम गाळून कमावलेल्या पैश्यांनी स्वतःच्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत आहे. त्याच्या शेतावर राजकारणी हरिदास झाडे यांनी पटवाऱ्याशी संगनमत करून, शासनाची दिशाभूल करून, दमदाटी करून, खोटे-नाटे बोलून ताबा घेतला. पीडित घुगुल कुटुंबाने याची रीतसर तक्रार तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब, तत्कालीन पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे कडे केली होती. तसेच आपली कैफियत चंद्रपूर व राजुरा येथे पत्रकार परिषद घेऊन मांडली होती. तत्कालीन तहसीलदारांनी सुद्धा अतिक्रमण गैरकायदेशिर व अनाधिकृत असल्याचे निदर्शनास आल्याने झाडे यांच्या विरुध्द महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ५० (२) अन्वये १०००/- (एक हजार रूपये) दंड आकारूण सदर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करण्यात येवुन ३ दिवसाचे आंत अतिक्रमण काढण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ कलम ५० (३) व (४) अन्वये १०००/- रू. दंड व प्रतिदिन ५०/- रू. प्रमाणे दंड वसुल करण्यात येईल, असा आदेश दि.२६.११.२०१५ रोजी पारित केला होता. 

स्वतःच्या विरोधात बनत असलेल्या माहौल ला बघून या महाशयांनी काही वर्तमान पत्रातील प्रतिनिधींना जाहिरातीचे लॉलीपॉप देऊन स्वतःच्या समर्थनार्थ बातम्या मध्यन्तरी प्रकाशित करून घेतल्या होत्या. जाहिरातीचे लॉलीपॉप घेतल्या नंतर काही जेष्ठ पत्रकारांच्या बातम्या वाचून, अबब... ११ वर्षाचा पोराने केले शेतावर अतिक्रमण म्हणण्याची वेळ वाचकांवर आली आहे. 

बातमीत नमूद केल्याप्रमाणे झाडे यांनी सन १९८७-८८ पासून या जागेवर कास्तकारी करीत असल्याचे म्हटले आहे. झाडे यांचा जन्म त्यांच्या आधार कार्डावर नमूद सन नुसार १९७६ असा आहे. त्यांनी अतिक्रमण केले सन १९८७-८८ म्हणजे अतिक्रमण करतेवेळी हरिदास झाडे यांचे वय ११ वर्ष होते. जे हास्यास्पद आहे. 

बातमीत नमूद केल्याप्रमाणे झाडे यांनी शासकीय नियमांनुसार भूमिहीनांना पट्टे देण्यात असल्याचा उल्लेख केला आहे. या अतिक्रमित जमिनीचा पट्टा मिळावा याकरिता अर्ज केल्याचा झाडे यांनी केला असा उल्लेख केला आहे. हरिदास झाडे यांचे वडील चंद्रभान भिवा झाडे यांचे नावाने १.४५ हे.आर. व २.०० हे.आर. जमीन असून मग त्यांच्या मुलगा हरिदास भूमिहीन कसा ?

झाडे यांनी तहसील प्रशासनाची तर दिशाभूल केलीच आणि आता प्रसारमाध्यमांचा काही प्रतिनिधींना हाताशी धरून नागरिकांतही धूळ झोकत असल्याचा आरोप पीडित शेतकरी घुगुल कुटुंबाने केला आहे. तहसील प्रशासनाने यावर लवकर तोडगा न काढल्यास घुगुल कुटुंबाने उपोषणाचा इशारा दिला आहे.

काय आहे वास्तविक प्रकरण येथे क्लिक करून वाचा

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top