Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: महाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या १० लाखांच्या पार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राज्यातील रुग्णांची संख्या आता देशात क्रमांक एकवर येऊन ठेपली आहे. राज्यात रुग्णांच्या संख्येत अनपेक्षित वाढ होत असून, गेल्या २४ तासांच २४ हज...

  • राज्यातील रुग्णांची संख्या आता देशात क्रमांक एकवर येऊन ठेपली आहे. राज्यात रुग्णांच्या संख्येत अनपेक्षित वाढ होत असून, गेल्या २४ तासांच २४ हजार ८८६ नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात नवे रुग्ण सापडण्याचा दर हा ६२ टक्के आहे..... वाचा सविस्तर..... 
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
मुंबई -
राज्यात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या १० लाखांच्या वर पोहचली आहे. देशात महाराष्ट्र हे एकटे राज्य आहे की ज्या राज्यात रुग्णांची संख्या इतर राज्यांहून अधिक गतीने वाढत आहे. राज्यातील रुग्णांची संख्या आता देशात क्रमांक एकवर येऊन ठेपली आहे. राज्यात रुग्णांच्या संख्येत अनपेक्षित वाढ होत असून, गेल्या २४ तासांच २४ हजार ८८६ नवे रुग्ण सापडले आहेत. राज्यात नवे रुग्ण सापडण्याचा दर हा ६२ टक्के आहे.

नवे रुग्ण सापडण्याच्या दरात केवळ दिल्लीच राज्याच्या पुढे आहे. राज्यात १४ दिवस पॉझिटिव्ह असण्याचा ट्रेंड हा २५.१ टक्के इतका आहे. नव्या चाचण्यांची संख्याही राज्यात वाढली असून, आता दर दिवशी राज्यात ८४५१० चाचण्या होत आहेत, यामुळे रुग्णसंख्येत ३३.९६ टक्के वाढ झाली आहे. काल शुक्रवारी राज्यात ३९३ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या २८ हजार ७२४ वर पोहचली आहे. राज्यात आत्तापर्यंत ७ लाख १५ हजार २३ रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.

सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ७१ हजार ६६६ इतकी आहे. मुंबईत नव्या रुग्णांची संख्या २१९१ इतकी आहे, तर एकूण रुग्णांची संख्या १ लाख ६५ हजार ३०६ इतकी आहे. मुंबईत शुक्रवारी दिवसभरात ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण मृतांची संख्या ८०६७ वर पोहचली आहे. 


(जाहिराती करिता संपर्क करा - 9975977378)


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top