Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: खबरदारीचा उपाय म्हणून सराफा बाजार आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय - राधेश्याम अडानिया
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा मध्ये सराफा बाजार आठ दिवस बंद वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी राजुरा - कोरोना महामारीचा वाढता उद्रेक लक्षात घेता राजुरा येथील सराफा व्यापा...

  • राजुरा मध्ये सराफा बाजार आठ दिवस बंद
वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी
राजुरा -
कोरोना महामारीचा वाढता उद्रेक लक्षात घेता राजुरा येथील सराफा व्यापारी असोसिएशनने आपली प्रतिष्ठाने आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर येथील सराफा व्यापार्‍यांनीसुद्धा आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. त्याच धर्तीवर राजुरा येथील सराफा व्यापारी असोसिएशनने सुद्धा निर्णय घेतला आहे. ९ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर या ‘आठ दिवसाच्या कालावधित सराफा व्यापारी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवणार आहेत. कोरोनाविषाणूचा अधिक संसर्ग होऊ नये आणि नागरिकांनीसुद्धा प्रतिष्ठानात येऊन गर्दी करू नये, या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही सराफा बाजार आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती नगर सेवक व सराफा व्यापारी एसोसिएशन, व्यापारी एसोसिएशन चे अध्यक्ष राधेश्याम अडानिया यांनी दिली. 



(जाहिराती करिता संपर्क करा - 9975977378)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top