- नंबर बंद होणार असल्याचे सांगुन ऑनलाईन उडविले १ लाख २० हजार रूपये
- भूलथापा देऊन ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढल्याने पोलिसही चिंतेत
वर्धा -
एअरटेल कस्टमर केअरमधून बोलत आहे. चोवीस तासात तुमचा मोबाईल नंबर बंद होणार आहे. नंबर सुरू ठेवण्यासाठी दहा रूपयांचा रिचार्ज करा. असे सांगत ओटीपी क्रमांक प्राप्त केला. यानंतर खात्यातील १ लाख २० हजार ७८३ रुपये उडविण्यात आले. ही घटना गुरूवारी उजेडात आली.
काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीचे अनेक गुन्हे समोर आले आहे. यामुळे मोठया प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. माहितीनुसार बोरगांव (मेघे) गणेशनगर येथील मनोज पुंडलीक चौधरी (५६) यांचे अॅक्सीस बॅकेत खाते आहे. ९१ सप्टेंबरला सायंकाळी त्यांना एका मोबाईल वरून कॉल आला. संबंधित इसमाने चौधरी यांना तुमचा मोबाईल क्रमांक २४ तासात बंद होणार आहे. नंबर सुरू ठेवण्यासाठी दहा रूपयांचा रिचार्ज करावा. यावर विश्वास ठेवुन चौधरी यांचेकडून ओटीपी क्रमांक प्राप्त केला.
मनोज चौधरी यांनी घरी गेल्यावर मोबाईल पाहल्या असता त्यांच्या खात्यातून १ लाख २० हजार ७८३ रुपये काढल्याचा मेसेज आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मनोज चौधरी यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात इसमाचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर सेल करीत आहे.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.