कोरपना -
जिल्ह्यातील कोरपना ही एक प्रमुख बाजारपेठ आहे. मात्र या बाजारपेठेत अनेक व्यवसाय नसल्याने ग्राहकांची गैरसोय होते आहे. या बाजार पेठेत वॉच सेंटर, ऑप्टिकल, कृषी मशनरी दुकान, ट्रॅक्टर शोरूम, स्टाईल दुकान, फर्निचर मार्ट, सा मिल, पुस्तकालय, आयुर्वेदिक औषधी दुकान, ड्रायक्लीन सेंटर, कपडा सेल, फूड बाजार, फिजिओथेरपी क्लिनिक, स्किन, डेंटल, स्त्री रोग, पेडियाट्रिक, होमिओपॅथिक, पंचकर्म क्लिनीक, जिम, स्पा सेंटर, बँड सेंटर, तेल गिरणी, कॅटरर्स, साउथ इंडियन हॉटेल, गॅस एजन्सी, ड्रायव्हिंग स्कूल, संगीत - नाट्य प्रशिक्षण केंद्र आदी व्यवसाय नसल्याने परिसरातील नागरिकांना इतरत्र बाजार पेठेत जाऊन खरेदी करावी लागते आहे. आज घडीला कोरपना बाजार पेठेत छोटे मोठे ४५० ते ५०० अनेक प्रकारची दुकाने आहे. तसेच कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या ठिकाणी दूर वरून नागरिक खरेदीसाठी येतात. मात्र सदर व्यवसाय नसल्याने बाजार पेठेत मोठी उणीव भासते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.