Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना तालुक्यात MIDC उभारावी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुशिक्षित बेरोजगारांची मागणी परिसराच्या विकासाला मिळेल चालना शैलेश कोरांगे - प्रतिनिधी कोरपना - तालुक्याची औद्योगिक तालुका म्हणून सर्व दूर ओ...

  • सुशिक्षित बेरोजगारांची मागणी
  • परिसराच्या विकासाला मिळेल चालना
शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -
तालुक्याची औद्योगिक तालुका म्हणून सर्व दूर ओळख आहे. मात्र गडचांदूर, नांदा, नारंडा सोनुर्ली, विरूर (गाडेगाव) वगळता कोरपना, पारडी, कोडशी भागात उद्योगधंदेच नसल्याने परिसरातील अनेक सुशिक्षित बेरोजगार पडले आहे. त्यामुळे या क्षेत्रात एमआयडीसीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी बेरोजगारा कडून होते आहे.

तालुक्यात चार सिमेंट उद्योग, एक कोळसा खाण, दहा जिनिंग प्रेसिंग कारखाने आहेत. मात्र येथील उद्योगात स्थानिक पेक्षा परप्रांतीय कामगाराचाच अधिक भरणा झाला आहे. त्यामुळे याठिकाणी कामाच्या संधी बेरोजगारांना उपलब्ध नाही. कोरपना भागात शासनाने एमआयडीसी उभारल्यास येथील बेरोजगार युवकांना हाताला काम मिळेल. तसेच रोजगाराच्या संधी प्राप्त होईल. पर्यायाने या भागाचा विकास होऊन बाजारपेठेला चालना मिळेल. या अनुषंगाने परिसरातील जेवरा, मांडवा, चोपण येथे मुबलक जागाही उपलब्ध आहे. त्यादृष्टीने शासनाने सकारात्मक हालचाली करून एम.आय.डी.सी. स्थापन करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top