राज्यात अनेक ठिकाणी विनाअनुदानित तत्वावर शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आहे. परंतु पंचवीस ते तीस वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लोटूनही शाळांना अनुदान व शिक्षकांना पगार सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे व्यवस्थापन समिती ना शाळा चालवणे कठीण झाले आहे.तसेच वेतना अभावी शिक्षकांन वरही उपासमारीची पाळी आली आहे. त्यातल्या त्यात कोरोना मुळे सर्वत्र रोजगार ठप्प पडल्याने आर्थिक मंदीचे सावट आहे. अशाही परिस्थितीत त्यांची झुंज सुरु आहे. मात्र शासनस्तरावरून याचा गांभीर्याने विचार केला जात नसल्याने दिवसेंदिवस त्यांच्यापु ढील अडचणी ही वाढतच चालल्या आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व बारामती येथील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जिल्ह्यात ही धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्राचार्य अनिल मुसळे व समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
बारामती येथील आंदोलनाला जिल्ह्यातील शिक्षकांचा पाठिंबा
कोरपना -
राज्यातील विना अनुदानित शाळांना अनेक वर्ष लोटूनही शासन अनुदान प्राप्त झाले नाही. तसेच येथील शिक्षकांनाही विना वेतनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने बारामती येथे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी जिल्ह्यातील विना अनुदानित कृती समिती च्या वतीने नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.