- आमदार सुभाष धोटे यांची मुख्यमंत्र्यांकडे निवेदना द्वारे मागणी
महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत सन 2020-21 साठी 28 कोटी 88 लक्ष 74 हजार निधी मंजुर आहे. सप्टेंबर 2020 अखेर राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष मुंबई कडुन जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षास 3 कोटी 80 लक्ष ऐवढा निधी प्राप्त झालेला आहे. अपुऱ्या निधी अभावी कर्मचाऱ्यांचे देयके देण्यास विलंब झालेला आहे. समुह संसाधन व्यक्ती यांचे मानधन देयके माहे सप्टेंबर २०१९ ते सप्टेंबर २०२० तसेच CTC, बँक सखी, FL-CRP यांचे मानधन देयके माहे जानेवारी २०२० ते सप्टेंबर २०२० मिळालेले नाही. त्यामुळे अभियानातील कार्यरत कंत्राटी कर्मचारी व त्यांचे कुटुंबियावर उपासमारीची वेळ उद्भवलेली आहे.
हि गंभीर बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान-उमेद अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूर करीता निधी उपलब्ध करून देण्याबाबत लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदना द्वारे कळविले आहे.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.