- सृजन नागरिक मंच चे संयोजक मिलिंद गड्डमवार यांनी केली मागणी
कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असतांना नविन इमारत ही शोभेची वास्तू बनून राहावी हे तर्कसंगत वाटत नाही. याबाबत आपण मा. तहसिलदार साहेब व दंडाधिकारी साहेब यांना योग्य त्या सुचना देऊन नविन रूग्णांची व्यवस्था नव्याने बांधलेल्या इमारतीत करण्यात यावी. तसेच रूग्णालयातील आरोग्य विषयक सुविधांचा आढावा घेण्यात यावा. अशी मागणी केली आहे.
राजुरा शहरातील रूग्णांचे वाढते प्रमाण व गांभिर्य लक्षात घेता आणि खाजगी डाॅक्टर्स मंडळींकडून होणारी रूग्णांची लुट लक्षात घेता कुठलाही विचार न करता आपणं नविन इमारत वापरात आणून वाढीव बेड्स, ईसीजी मशीन, ऑक्सिजन यंत्रणा, व्हेंटिलेटर इ. ची व्यवस्था करावी. तसेच एम.डी डाॅक्टर, आरोग्य सेवक, परिचारीका इ. कर्मचाऱ्यांची स्थायी तत्त्वावर नियुक्ती करण्यात यावी. कोरोनाच्या काळात डाॅक्टर्स व आरोग्य सेवेत येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपला जीव धोक्यात घालून काॅनट्रक्ट बेसीसवर आपली सेवा द्यावी अशी राज्य सरकारची इच्छा असेल तर ती चुकीची ठरते आहे. सरळ भरती पध्दतीत कुठलीही अडवणूक करता कामा नये. कारण जनतेचा जीव महत्त्वाचा असल्याकारणाने त्वरीत भरती प्रक्रिया अंमलात आणून आरोग्य सुविधा देण्यात यावी अशी मागणी 'सृजन नागरिक मंच' राजुरा च्या वतीने करण्यात आलेली आहे.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.