Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: 10 सप्टेंबर पासून ऑनलाईन उद्योजकता विकास प्रशिक्षण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी चंद्रपूर - महाराष्ट्र  उद्योजकता  विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे  10 वी  पास...

  • युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
महाराष्ट्र  उद्योजकता  विकास केंद्र, चंद्रपूरद्वारे  10 वी  पास  व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरीता 10 ते 22 सप्टेंबर या कालवधीमध्ये ऑनलाइन उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेत ऑनलाईन बिझनेस संधी, आयडिया, उद्योजकता व उद्योजकाचे गुण, लघु उद्योग उभारणी, विविध उद्योग संधी मार्गदर्शन, सेवा उद्योग व लेदर इंडस्ट्रीज, शेतीवर आधारीत उद्योग, पशुसंवर्धन इत्यादी उद्योगातील संधी, उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, संभाषण कौशल्य, संकलन व आकलन कौशल्य, सर्जनशीलता, नाविन्यपूर्तता व समस्या निराकरण, संघटनाचे प्रकार, शासकीय कार्यालयातील विविध योजना, बाजारपेठ पाहणी, साधने व तंत्रज्ञान, उत्पादन निवड, उद्योगासाठी लागणारे परवाने नाहकरत प्रमाणपत्र व नोंदणी, जीएसटी नोंदणी, उद्योगाचे व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, उत्पादन व कच्चा माल यांचे व्यवस्थापन, उत्पादन नियंत्रण व नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, प्रकल्प अहवाल, डिजीटल मार्केटिंग, ऑनलाईन कर्ज प्रक्रीया व कृती आराखडा तयार करुन अंमलबजावणी करणे इत्यादी विषयावर ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात ऑनलाइन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक- युवतींनी त्वरीत दिनांक 9 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, उद्योग भवन, दुसरा माळा, गाळा क्र. 208, बस स्टॉप समोर, रेल्वे स्टेशन रोड, चंद्रपुर येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के.व्ही.राठोड (मो.नं.9403078773, 07172-274416) व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे (मो.नं.9011667717) यांच्याशी संपर्क साधावा.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top