ज्या विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेकरीता आवेदनपत्र भरले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांनी मागील वर्षाची प्रथम सत्रांत परीक्षा एकुण 900 गुणांची गुणपत्रिका संबंधित शाळेकडून प्राप्त करुन घ्यावी. पालकांनी किंवा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे गुण पत्रिकेतील गुण mtpss.org.in या लिंकवर भरुन स्कॅन केलेली गुणपत्रिकेची प्रत पीएनजी, आयपीइजी, जेपीजी, पीडीएफ या स्वरूपात अपलोड करावी. (श्रेणीची गुणपत्रिका स्विकृत केली जाणार नाही). सदर कार्यवाही करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे.
दिलेल्या लिंकवर माहिती भरतांना गुणपत्रिकेची स्कॅन कॉपी मोबाईल, संगणकमध्ये साठवून (सेव्ह) ठेवावी व नोंदणी केलेला मोबाईल ओटीपी करीता जवळ ठेवावा. गुणपत्रिका ऑनलाईन अपलोड करण्याच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती (परिशिष्ट 1 व 2) संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांना वेगळ्या पत्राव्दारे पाठविण्यात आलेली आहे. पत्र प्राप्त न झाल्यास पत्राची प्रत दिनांक 12 सप्टेंबर 2020 चे आत कार्यालयीन वेळेत प्रकल्प कार्यालयातून प्राप्त करुन घेता येईल. तसेच या संबंधाने काही तांत्रिक अडचणी येत असल्यास समन्वय अधिकारी अशोक बेलेकर (मो.क्र. 9834138867) यांचेशी संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.