- मुख्यमंत्री यांना एसडीओ मार्फत दिले निवेदन
चिमूर -
राज्यातील मराठा जाती चे आरक्षण ओबीसी संर्वंगात समाविष्ट करू नये या मुख्य मागणी चे निवेदन चिमूर तालुका कुणबी महिला समाज संघटना अध्यक्ष सौ. ज्योती ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एसडीओ मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना दिले आहे
चिमूर तालुका कुणबी महिला समाज संघटनेच्या निवेदनात मराठा समाजास ओबीसी संवर्गात समाविष्ट करू नये, जनगणना करीत असताना ओबीसी साठी स्वंतत्र रकाना तयार करण्यात यावा, २७% आरक्षण देण्यात यावे, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी या मागण्याचे निवेदन कुणबी महिला समाज संघटना तालुका अध्यक्ष सौ. ज्योती ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एसडीओ मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सचिव नीता लांडगे, किरण धोटे, सुनीता करारे, गीतांजली थुटे तसेच गजाननजी शिंदे, रमेश करारे उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.