- महानगर भाजपाचा सेवा सप्ताह
- व्हर्च्युअल सभा - भाजयुमोचा उपक्रम
चंद्रपूर -
कोरोनाचे संकट टळणार नाही. त्याच्या सोबतच आता जीवन जगावे लागेल. जो पर्यंत यावर रामबाण उपाय शोधला जात नाही, तो पर्यंत हीच स्थिती राहणार आहे. नियमित व्यायाम करणे. योग्य ती काळजी घेणे, जीवनशैली बदलणे, हाच यावर उपाय आहे, असे प्रतिपादन भाजपा चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले. ते भाजपा महानगर तर्फे, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या जन्मदिना निमित्य आयोजित सेवा सप्ताह अंतर्गत भाजयुमोच्या व्हर्च्युअल सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर भाजयुमो जिल्हाअध्यक्ष (श) विशाल निंबाळकर, जिप सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांची उपस्थिती होती.
डॉ गुलवाडे म्हणाले, कोरोनाचे अनेक प्रकार आहेत. परंतु कोविड १९ हा आजार ज्या कोरोनाने होतो त्यावर उपाय नाही. आपण कोरोनाला हरवू शकत नाही, पण त्यावर जीवनशैली बदलून विजय मिळवू शकतो. भीती न बाळगता लक्षणे दिसताच तपासणी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी कोरोनाचे प्रकार विशद करीत तपासणीचे मुद्दे समजावून सांगितले यात ऍनटीबॉडी, ऍनटीजेन, आर टी पी सी आर, स्व्याब टेस्ट, रेडिओ लॉजिकल, एच आर सी इ. चा यात समावेश होता. चंद्रपुरात सद्या १५०० ऑक्सिजन चे तर ५०० अतिदक्षता बेडस्ची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टी सदैव आपल्या सोबत आहे. कोरोनाच्या संकटात आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून अनेक प्रकल्प राबविण्यात आले. त्यामुळे समाजात जागरूकता आली. अनेकांना या काळात त्यांनी मुक्तहस्ते मदत केली व ती आजही सुरू आहे. त्यांच्यामुळे चंद्रपुरात लवकरच सर्व सुविधा उपलब्ध होणार असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या संपर्कात आ.मुनगंटीवार असल्याचे ते म्हणाले. जनतेनी गैरसमज दूर करून कोणत्याही अफवेला बळी पडू नये असे आवाहन करीत, सेवा प्रकल्पामुळे जनतेचा भाजपा वरील विश्वास वाढला आहे असेही ते म्हणाले. यावेळी प्रास्ताविकात ब्रिजभूषण पाझारे यांनी डॉ गुलवाडे यांचा परिचय करून देत, जनतेशी संवाद साधून समस्या व समाधान जाणून घेण्याचा प्रयत्न व्हर्च्युअल सभेच्या माध्यमातून होत असल्याचे सांगितले.
सभेचे संचालन भाजयुमोचे कृष्णा चंदावार यांनी केले, तर विशाल निंबाळकर यांनी आभार मानले. सभेच्या थेट प्रसारण प्रसंगी भाजपा नेते राजेंद्र गांधी, प्रमोद कडू, प्रशांत विघ्नेश्वर, रामकुमार अकापेलिवार, भाजयुमो नेते प्रज्वलंत कडू, सूरज पेदूलवार, सुनील डोंगरे, कुणाल गुंडावार, मनीष पिपरे, राहुल पाल, पवन ढवळे यांची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित सर्वांनी भारतमातेचे पूजन केले.






टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.