- हि आहे जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार स्पर्धेतील गावे
- वाचा सविस्तर...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, विस्तार अधिकारी राईंचवार, ग्राम विकास अधिकारी अरुण वाकुडकर यांनी आदर्श ग्राम घाटकुळची जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम स्पर्धेअंतर्गत तपासणी केली. यावेळी पं.स.सदस्य विनोद देशमुख, पोंभुर्णाचे गटविकास अधिकारी धनंजय साळवे, विस्तार अधिकारी कुर्झेकर, सरपंच प्रिती मेदाळे, ग्रामसेवक ममता बक्षी, अविनाश पोईनकर, मुकुंदा हासे, विठ्ठल धंदरे व पदाधिकारी उपस्थित होते. समितीने सर्व कागदपत्रांची पडताळणी करून गावाची पाहणी केली व मूल्यांकन केले.
जिल्हा स्मार्ट ग्राम समितीच्या स्वागतासाठी गावातील कुंभार समाजाने माती कलेतून बनवलेल्या मडक्यापासून तर केवट समाजाने मासे पकडणाऱ्या जाळे पासून स्वागत गेट तयार केला. गावातील युवा जनहित व मराठा युवक मंडळाने श्रमदानातून तयार केलेल्या चौक सौदर्यीकरणाचे समितीने कौतुक केले. गावात स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक ऊर्जा व पर्यावरण, पारदर्शता या स्मार्ट ग्राम निकषानुसार विकास कामे झाली असून गाव सर्व सोयी सुविधा युक्त आहे. घाटकुळ हे गाव लोकसहभाग व ग्रामपंचायतीच्या नाविण्यपुर्ण उपक्रमाने जिल्ह्यात दिशादर्शक ठरत आहे. मागील तीन वर्षांपासून घाटकुळ ग्रामवासियांनी सातत्यपुर्ण परिश्रम केले. जिल्हा स्मार्ट ग्राम समीतीच्या निर्णयाकडे आता ग्रामस्थांचे लक्ष केंद्रित झाले आहे.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.