Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: माजी सैनिक व माजी सैनिकाच्या विधवा पत्नीस मालमत्ता करातून सुट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
श्रावण कुमार - प्रतिनिधी चंद्रपूर - महाराष्ट्र शासनाच्या विविध शासन निर्णयांद्वारे माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांच्या नावावर असलेल्या निव...


श्रावण कुमार - प्रतिनिधी
चंद्रपूर -
महाराष्ट्र शासनाच्या विविध शासन निर्णयांद्वारे माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांच्या नावावर असलेल्या निवासी मालमत्तेच्या मालमत्ता करातून सुट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ त्यांना लागू राहिल. ही सुट पात्र माजी सैनिकांना व माजी सैनिक विधवांना मिळणेकरीता त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून पात्रता प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित माजी सैनिक व माजी सैनिक विधवांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून दिल्या गेलेले ओळखपत्र व मालमत्ता कराची छायांकित प्रत घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास संपर्क साधावा व पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दिपक लिमसे यांनी केले आहे.











About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top