Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: तालुका क्रीडा संकुलाचे काम तातडीने पूर्ण करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमदार सुभाष धोटेंच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याना सुचना अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी  राजुरा - राजुरा, कोरपना व गोंडपिपरी शहरातील क्रीडा संक...

  • आमदार सुभाष धोटेंच्या जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याना सुचना
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी 
राजुरा -
राजुरा, कोरपना व गोंडपिपरी शहरातील क्रीडा संकुलाचे दुरुस्तीचे काम गेली अनेक वर्षा पासून रखडलेले आहे. येथील  क्रीडा प्रेमी नागरिक आणि खेळाडूंची मागणी लक्षात घेता येथे सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने आमदार सुभाष धोटे यांनी दिनांक २२ सप्टेंबर २०२० रोजी राजुरा येथे बैठक घेऊन तातडीने क्रीडा संकुलांची दुरुस्ती करून युवकांना क्रीडा संकुल उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा क्रीडा अधिकारी मुस्ताक यांना दिल्या आहेत. 

 राजुरा शहरालगत सुमारे ५ एकर परिसरात तालुका क्रीडा संकुल आहे. इनडोअर खेळ खेळण्यासाठी मोठे हॉल आहे. मैदानी कसरतीसाठी मोठे मैदान उपलब्ध आहे. परंतु क्रीडा विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष असल्याने या संकुलाची देखभाल दुरुस्ती होत नाही. क्रीडा संकुलाचे परिसरात झुडपे व गवत वाढलेले आहे. क्रीडा प्रेमींना व पोलीस प्रशिक्षण भरतीमधील युवकांना तालुक्याचे ठिकाणी सुविधा असूनही याचा लाभ घेता येत नाही. शासनाचे लाखो रुपये खर्च करून निर्माण करण्यात आलेले जनउपयोगी वास्तू धूळ खात पडलेली आहे. तातडीने क्रीडा संकुलाची दुरुस्ती करून खेळाडू युवकांकरिता संकुल सुरु करण्याबाबतच्या सूचना राजुरा विधासभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी मुस्ताक यांना दिल्या आहेत. यामुळे स्थानिक परिसरातील क्रीडा प्रेमी युवकांना विविध खेळ प्रकारात आपले नाव कमावण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच विविध खेळ प्रकारांना बळ मिळून क्षेत्रातील क्रीडा प्रेमींना अच्छे दिन पहायला मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.






About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top