Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: घुग्घुस येथे मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निरोगी आरोग्यासाठी प्रार्थना
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोरगरिबांचे कैवारी, कोरोना काळात जिल्ह्यातील जनतेला दिवस-रात्र मदत करणाऱ्या सुधीरभाऊंना उदंड आयुष्य लाभो - भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे ...

  • गोरगरिबांचे कैवारी, कोरोना काळात जिल्ह्यातील जनतेला दिवस-रात्र मदत करणाऱ्या सुधीरभाऊंना उदंड आयुष्य लाभो - भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
मनोज सोगलकर - विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर -
घुग्घुस येथील गांधी चौकातील हनुमान मंदिरात आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या निरोगी आरोग्यासाठी चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांनी प्रार्थना केली.

काही दिवसापुर्वीच मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना कोरोना संसर्ग झाला. त्या अनुषंगाने घुग्घुस भाजपा पदाधिका-यांनी घुग्घुस येथील गांधी चौकातील हनुमान मंदिरात जाऊन प्रार्थना केली. 

चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांनी हनुमान मंदिरात आरती केली तसेच हनुमान चालीसाचा पाठ करण्यात आला. यावेळी चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे हे म्हणाले की मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी कोरोना आजारावर मात करावी त्यांचे आरोग्य चांगले राहावे व लवकारात लवकर प्रकॄतीत सुधारना व्हावी आणी पुन्हा ते लोकांच्या सेवेत रुजु व्हावे यासाठी भाजपाच्या वतिने जिल्हाभर प्रार्थना केली जात आहे. लोकनेते मा आ सुधीरभाऊ मुनगंटीवार कोरोना महामारीत सहा महिण्यापासुन जिल्ह्यातील गरिब, गरजू लोकांना मदत करीत उपाय योजना केली. गोर गरीबांना धान्य किट, मास्क, जेवण सॅनिटाईजर वाटप करुन समाजाच्या गरिब वर्गाला मदतीचा हात दिला. त्यांना प्रभू स्वस्थ व उदंड आयुष्य देवो.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, वाहतुक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बोबडे, मनोज पराशर, अनिल नित, दिपक तंबाखे, श्रीनीवास कोत्तुर, पंकज रामटेके, उमेश दडमल उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top