Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: पुण्यातील स्केटिंग स्पर्धेत अधीरची दमदार कामगिरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पालक सुबोध जुन्नावार आणि अमृता जुन्नावार यांच्या पाठबळाने यश आमचा विदर्भ - दीपक शर्मा  चंद्रपूर (दि. ०८ एप्रिल २०२६) -         राज्यातील प्र...
पालक सुबोध जुन्नावार आणि अमृता जुन्नावार यांच्या पाठबळाने यश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. ०८ एप्रिल २०२६) -
        राज्यातील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या यंगस्टार्स रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत चंद्रपूरच्या चिमुकल्या अधीर सुबोध अमृता जुन्नावार याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला. अल्पवयातच उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवत अधीरने चंद्रपूर जिल्ह्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले आहे.

         ही स्पर्धा पुणे येथील विमाननगर परिसरातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रोलर स्केटिंग रिंकवर मोठ्या उत्साहात पार पडली. राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून शेकडो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. उच्च दर्जाच्या स्पर्धात्मक वातावरणातही अधीरने आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावी खेळ सादर करत आपली वेगळी छाप पाडली. अंडर-६ वर्षे इनलाईन गटात सहभागी झालेल्या अधीरने सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर दिली. उत्कृष्ट संतुलन, वेग आणि तांत्रिक अचूकतेच्या जोरावर त्याने प्रेक्षकांचे आणि परीक्षकांचे लक्ष वेधून घेत अखेर तृतीय क्रमांक पटकावण्यात यश मिळवले.

        या यशामागे प्रशिक्षक विनोद निखाडे यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. सातत्यपूर्ण सराव, योग्य तंत्रज्ञान आणि प्रोत्साहनामुळे अधीरने अल्पवयातच मोठी कामगिरी करून दाखवली. तसेच पालक सुबोध जुन्नावार आणि अमृता जुन्नावार यांचे पाठबळही त्याच्या यशात मोलाचे ठरले. स्पर्धेनंतर अधीरचा मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे, त्याची नुकतीच एशियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली असून, ही कामगिरी त्याच्या क्रीडा कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे.

        अधीरच्या या यशामुळे चंद्रपूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. क्रीडाप्रेमी, नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
#AdhirJunnawar #ChandrapurNews #SkatingChampion #YoungSkater #RollerSkating #MaharashtraSports #PuneCompetition #SportsNewsIndia #Under6Champion #AsianBookOfWorldRecords #ProudMoment #ChandrapurTalent #FutureChampion #Inspiration #KidsSports #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top