Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: “चालू या आरोग्यासाठी” उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
डॉ. मिलिंद कांबळे यांचे आरोग्यविषयक मार्गदर्शन आमचा विदर्भ - दीपक शर्मा  चंद्रपूर (दि. ०८ एप्रिल २०२६) -         जागतिक आरोग्य दिनानिमित्त श...
डॉ. मिलिंद कांबळे यांचे आरोग्यविषयक मार्गदर्शन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. ०८ एप्रिल २०२६) -
        जागतिक आरोग्य दिनानिमित्त शहरात “चालू या आरोग्यासाठी” या सामाजिक उपक्रमांतर्गत भव्य वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले. आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन इंडियन रेड क्रॉस सोसायटी, सखी मंच, इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA), स्त्री व प्रसूती रोग विशेषज्ञ संघटना चंद्रपूर, बँक ऑफ महाराष्ट्र चंद्रपूर, टाटा कॅन्सर फाउंडेशन चंद्रपूर, इंडियन डेंटल असोसिएशन तसेच शासकीय नर्सिंग कॉलेज चंद्रपूर यांच्या सहकार्याने करण्यात आले. सदर वॉकथॉन सकाळी ७ वाजता गांधी चौक ते जटपूरा गेट या मार्गावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आरोग्याविषयी जागरूकतेचा संदेश दिला.

         या उपक्रमात अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, महाराष्ट्र आयएमए माजी उपाध्यक्ष तथा इंडियन रेडक्रॉस सोसायटी सचिव डॉ. मंगेश गुलवाडे, आयएमए अध्यक्ष डॉ. प्रसाद पोटदुखे, स्त्रीरोग तज्ञ संघटना अध्यक्षा डॉ. कल्पना गुलवाडे, चंद्रपूर बचाव संघर्ष समिती अध्यक्ष डॉ. मनीषा मुंदडा, इंडियन डेंटल असोसिएशन अध्यक्ष पंकज कावळे, डॉ. विलास मुळे, डॉ. उषा अरोरा, टाटा कॅन्सर फाउंडेशन प्रतिनिधी डॉ. आशिष बारब्दे, रेड क्रॉस सोसायटी प्रतिनिधी शादाब चिनी, डॉ. पियुष मेश्राम, निलेश पाझारे, डॉ. किरण जानवे, डॉ. महेश भांडेकर, डॉ. गोपाल राठी, डॉ. सौरभ राजूरकर, डॉ. हर्ष मामीडवार, एस.पी. कॉलेज प्रतिनिधी कुलदीप गोंड, डॉ. भार्गव बांडे, अश्विनी खोब्रागडे, डॉ. विनोद नगराळे, डॉ. पूनम नगराळे यांच्यासह अनेक मान्यवर व शासकीय नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.
        यावेळी मार्गदर्शन करताना अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सुदृढ आरोग्यासाठी नियमित व्यायाम, चालणे, संतुलित आहार आणि सकारात्मक जीवनशैली यांचे महत्त्व अधोरेखित केले. बदलत्या जीवनशैलीमुळे वाढणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वॉकथॉनमध्ये सहभागी नागरिकांनी विविध फिटनेस उपक्रम, कवायती आणि घोषणांद्वारे “आरोग्यम धनसंपदा” हा संदेश दिला. विशेषतः शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

       नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे, नियमित व्यायामाची सवय लावणे आणि निरोगी समाज घडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संस्था, मान्यवर, स्वयंसेवक आणि नागरिकांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.
#WorldHealthDay #ChandrapurNews #Walkathon #HealthAwareness #DrMilindKamble #drmangeshgulwade #StayHealthy #FitnessFirst #HealthyLifestyle #ArogyaSathi #MaharashtraNews #PublicHealth #WalkForHealth #FitnessMovement #HealthCampaign #IndiaHealth #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top