Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: सरपंच प्रीमियर लीग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रभारत्न ग्लॅडिएटर विजेता, श्री शिवछत्रपती उपविजेता सरपंच निकिता रमेशभाऊ झाडे यांच्या पुढाकारातून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद आमचा विदर्भ...
प्रभारत्न ग्लॅडिएटर विजेता, श्री शिवछत्रपती उपविजेता
सरपंच निकिता रमेशभाऊ झाडे यांच्या पुढाकारातून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ०८ एप्रिल २०२६) -
        रामपूर येथे शिव मंदिर नाईट क्रिकेट क्लबतर्फे आयोजित सरपंच चषक प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (ता. ४) उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. अंतिम सामन्यात प्रभारत्न ग्लॅडिएटर आणि श्री शिवछत्रपती या संघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर प्रभारत्न ग्लॅडिएटर संघाने शानदार खेळ करत सरपंच चषकावर आपले नाव कोरले. श्री शिवछत्रपती संघ उपविजेता ठरला, तर जय जगन्नाथ संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

        स्पर्धेचे आयोजन रामपूर येथील सरपंच निकिता रमेशभाऊ झाडे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. ग्रामपंचायत माजी सदस्य व शिवसेना तालुका प्रमुख रमेश झाडे यांनी प्रथमच अशा स्वरूपाची सरपंच चषक प्रीमियर लीग स्पर्धा आयोजित करून गावातील क्रीडा संस्कृतीला चालना दिली. राजुरा तालुक्यातील विविध भागांतून एकूण २० संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.

        या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे आयपीएलच्या धर्तीवर खेळाडूंची नोंदणी व लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. संघमालकांनी बोली लावून खेळाडूंना आपल्या संघात सामील करून घेतल्याने स्पर्धेला वेगळे आकर्षण प्राप्त झाले. सात दिवस चाललेल्या या नाईट क्रिकेट स्पर्धेत दररोज सायंकाळी सामने रंगले. उत्तम प्रकाशयोजना आणि आसनव्यवस्थेमुळे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामन्यांचा आनंद घेतला.

        विजेत्या प्रभारत्न ग्लॅडिएटर संघाला संघमालक केतन जुनघरे आणि राजकुमार डाखरे यांचे मार्गदर्शन लाभले. अंतिम सामन्यानंतर विजेत्या व उपविजेत्या संघांना सरपंच निकिता रमेशभाऊ झाडे, सरपंच आशाताई बबन पाटील उरकुडे (गोवरी), शिवसेना तालुका प्रमुख रमेशभाऊ झाडे, बंटी उर्फ अमितदादा मालेकर, माजी सरपंच उज्वल शेंडे, दिलीप पाटील देठे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

        यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत माजी सदस्य रमेश झाडे, अध्यक्ष विनोद काटवले, उपाध्यक्ष विनोद आस्कले, सचिव प्रज्ज्वल भोंगळे, सदस्य पियुष डाखरे, कृष्णा गिते, अच्युत बावणे, हनुमान मालेकर, अमोल मालेकर, सतीश थेरे, अभिजीत मालेकर, अशोक बोबडे, सूरज मालेकर, बंटी मालेकर, मयंक पाचभाई, सौरव शेरकुरे, मंथन झाडे, हर्षल निमकर, मनीष लांडे, बबन लोहडे, निखिल कावळे, संदीप पाचभाई, दिलीप ठेंगणे, मधुर गिते आणि प्रविण कोवे यांनी विशेष सहकार्य केले.

        सरपंच निकिता रमेशभाऊ झाडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात खेळामुळे युवकांना सकारात्मक दिशा मिळते. क्रिकेटसारख्या संघभावनेवर आधारित खेळातून शिस्त, नेतृत्वगुण आणि परस्पर सहकार्य वाढते. अशा स्पर्धांमुळे गावातील तरुणांना व्यसनांपासून दूर ठेवून त्यांची ऊर्जा योग्य दिशेने वळवता येते. भविष्यातही अशा क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
#RampurCricket #SarpanchChashak #RajuraNews #CricketTournament #NightCricket #VillageCricket #MaharashtraSports #PrabhatGladiator #ShivChhatrapatiTeam #JayJagannathTeam #LocalSportsNews #CricketLovers #SportsInVillage #Sarpanch #NikitaZade #Rampur #FormerGramPanchayatmember #RameshZade #ShivSenaUBT #TalukaPramukha #ameetmalekar #UjwalShende #DilipDethe #ChandrapurNews #YouthAndSports #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top