विदर्भ राज्य आंदोलन समितीची निवेदनाद्वारे मागणी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर -
विदर्भातील जनतेशी निगडीत जनहिताच्या अत्यंत महत्वाच्या तीन प्रश्नांवर तातडीने निर्णय घेवून या मागण्यांची पुर्तता करावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीने राज्याचे मुख्यमंत्री यांना चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन पाठवून केली आहे.
विदर्भ राज्य आंदोलन समितीने महामार्गाकरीता भुसंपादन केलेल्या जमीनीला नव्या दराने मोबदला मिळत असतांना व शेतजमीनीचे बाजारभाव दिवसेंदिवस वाढत असतांना शासनाने कृषि वापरासाठीच्या शेतजमीनीचा मोबदला २० टक्के कमी करण्याचा व अकृषक जमीनीसाठीचा मोबदला ६० टक्के कमी करण्याचा घेतलेला निर्णय शेतक-यांवर अन्याय करणारा असल्याने तो निर्णय तात्काळ परत घ्यावा, विदर्भातील उदयोगांना देय असलेली १२०० कोटी रूपयाची विज सबसिडी राज्य शासनाने रोखून धरून विदर्भातील जनतेवर , उदयोगांवर अन्यायाची मालिका सुरूच ठेवली आहे. ती सबसिडी राज्य सरकारने तातडीने वितरीत करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव, अर्थमंत्री, उर्जामंत्री व उर्जासचिव यांना यथाशिघ्र निर्गमीत करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या समस्यांची तातडीने पुर्तता करण्यात यावी आणि विदर्भातील जनतेवर, उदयोगांवर, शेतकऱ्यांवर, पर्यटनावर होणारा अन्याय तातडीने दूर करण्यात यावा व विदर्भातील जनतेला न्याय मिळावा, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड.वामनराव चटप, जिल्हाध्यक्ष किशोर दहेकर, जिल्हा सचिव अंकुश वाघमारे, कोअर समिती सदस्य ॲड.मो.वि.टेभुर्डे, हिराचंद बोरकुटे, रमेश राजुरकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ॲड. वैशाली कटलावार, पपीता जुनघरे, कपित इद्दे, विभागीय सचिव मितीन भागवत, रमेश नळे, मधुकर चिंचोलकर, सुदाम राठोड, योगेश मुरेकर, अनिल दिकोंडवार, गुलाब चिलके, नागसेन खंदारे, अतुल दिकोंडावर, इंदुताई डोंगरे, प्रितीताई रामटेके, अविनाश उके, मुन्ना आवळे, इश्वर सहारे, राजेश माकोडे यांनी ना. मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देऊन मागणी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.