Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अतिक्रमण हटाव मोहीम जाचाला कंटाळून शेतकऱ्याने घेतले विष
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अतिक्रमण हटाव मोहीम जाचाला कंटाळून शेतकऱ्याने घेतले विष धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी कोरपना - कोरपना पासून दहा किलोमीटर अंतरावर ...
  • अतिक्रमण हटाव मोहीम जाचाला कंटाळून शेतकऱ्याने घेतले विष
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
कोरपना पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडवा येथील 14 शेतकऱ्यांचे सर्वे नंबर 59 व नवीन 114 मध्ये आदिवासी शेतकऱ्यांचे व पंधरा ते वीस आदिवासी शेतकऱ्यांचे अतिक्रमण 1977 पासून असून जमीन कसून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. 
वन अधिकारी जेसीबी घेऊन ताफ्यासह मांडवा येथील सर्वे नंबर 114 चे अतिक्रमण हटविण्यासाठी पोहोचले. त्या ठिकाणी कापूस, तूर पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली असता बाळकृष्ण काळे व त्यांची पत्नी पार्वता यांनी टाहो करत आमचे कुटुंब उध्वस्त करू नका उभे पीक उध्वस्त करू नका असे ओरडत असतानाच बाळकृष्ण हा मी व माझे कुटुंब उघड्यावर पडणार आहोत असे म्हणत विषारी औषध प्राशन करत जीवन जगण्यापेक्षा जीवन संपवणे बरे म्हणून जेसीबी पुढे पडले. त्यांना कुटुंबीयांनी वन कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने रुग्णालयात दाखल केले. मात्र येथून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. कोरपना, राजुरा व जिवती या तालुक्यात अनेक गावांमध्ये गेल्या पन्नास-साठ वर्षापासून अतिक्रमण करून हजारो कुटुंब उदार निर्वाह करत जगत आहे. अतिक्रमण हटविण्याच्या या कारवाईत अनेक कुटुंब उघड्यावर येणार असून आता हे कुटूंब दहशतीत जीवन जगत आहे. 

यापूर्वी महसूल विभागाने काही शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे दिले व वन कायदा 2005 अस्तित्वात आल्यानंतर तीन पिढ्याची अट व शर्तीमुळे वन हक्काच्या दावा पासून वंचित राहिले. शासनाने यापूर्वी अतिक्रमण तपासण्यासाठी समित्या गठित केल्या होत्या मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील पूर्वीच्या राजुरा व सध्याचे कोरपना-जिवती हा भाग हैदराबाद निजाम शासन यांच्या अधिपत्याखाली होता व नंतर काही काळ आदिलाबाद व नांदेड जिल्ह्यामध्ये समावेश असल्याने चंद्रपूर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर चंद्रपूर मध्ये हा भाग समाविष्ट झाला. मात्र 1960 पूर्वीचे कोणतीही पुरावे याठिकाणी मिळत नव्हते. यापुढे विष प्राशन सारखी घटना घडू नये. शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील निजाम राजवटी क्षेत्रातील अट शिथिल करून सर्वसामान्यांना न्याय द्यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आबिद अली यांनी केली आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top