- बाधितांच्या संख्येत होणारी वाढ चिंताजनक
- 607 पॉझिटिव्ह 1 मृत्यू
- ॲक्टीव्ह रुग्ण 2926
- चंद्रपूर जिल्हा आजचे कोरोना अपडेट
- कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्य सेवा
- कंत्राटी पद्धतीने स्पेशालिस्ट व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अर्ज आमंत्रित
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दि. 21 जानेवारी : कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत लगातार वाढ होत असुन गत 24 तासात जिल्ह्यात 262 जणांनी कोरोनावर मात केली असून त्या रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 607 नवीन रुग्ण बाधीत झाले आहे. तर शुक्रवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 277, चंद्रपूर 60, बल्लारपूर 88, भद्रावती 4, ब्रह्मपुरी 21, नागभीड 12, सिंदेवाही 6, मुल 37, सावली 11, पोंभूर्णा 4, गोंडपिपरी 1, राजुरा 18, चिमूर 36, वरोरा 3, तर कोरपना 20, जिवती येथे 9 रुग्ण आढळून आले असून इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये मुल तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 93 हजार 48 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 88 हजार 575 झाली आहे. सध्या 2926 बाधितांवर उपचार सुरू आहेत.
आतापर्यंत 8 लाख 29 हजार 876 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 34 हजार 856 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1547 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना आरोग्य सेवा कंत्राटी पद्धतीने स्पेशालिस्ट व वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अर्ज आमंत्रित
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, साथ उद्रेक सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, व डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल स्थापन करण्यात आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांना सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून अतिरिक्त कंत्राटी पद्धतीने आरोग्य सेवा देणारे स्पेशालिस्ट व वैद्यकीय अधिकारी यांची आवश्यकता आहे.
आरोग्य सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी यांची कोविड-19 साथीचा संसर्गजन्य आजार नियंत्रणात येईपर्यंत, शासकीय, महापालिका तसेच नगरपालिका मधून सेवानिवृत्त झालेले, बाँड पूर्ण न झालेले व इतर परंतु आरोग्य सेवा देण्यास स्पेशालिस्ट व वैद्यकीय अधिकारी(एमबीबीएस/बीएएमएस) यांची कंत्राटी पदे भरावयाची आहे.
भरण्यात येणारी कंत्राटी पदे: फिजिशियनची 8 पदे, अनेस्थेटिस्ट 8 पदे, मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस) 28 पदे,तर मेडिकल ऑफिसर (बीएएमएस) ची 28 पदे भरावयाची असून कमाल वयोमर्यादा सर्व पदांसाठी 60 वर्षे आहे. तरी, इच्छुक उमेदवारांनी 28 जानेवारी 2022 रोजी सुट्ट्यांचे दिवस वगळून सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. तसेच उमेदवारांनी https://chanda.nic.in व https://zpchandrapur.maharashtra.gov.in/en या संकेतस्थळावर जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून त्याप्रमाणे विहीत नमुन्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय,चंद्रपूर येथे अर्ज सादर करावे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.