Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गडचांदुर शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी असलेली दारूची दुकाने शहराबाहेर हटवण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गडचांदुर शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी असलेली दारूची दुकाने शहराबाहेर हटवण्याची मागणी भीम आर्मी तर्फे जिल्हाधिकारीना निवेदन द्वारे मागणी मागणील...
  • गडचांदुर शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी असलेली दारूची दुकाने शहराबाहेर हटवण्याची मागणी
  • भीम आर्मी तर्फे जिल्हाधिकारीना निवेदन द्वारे मागणी
  • मागणीला शहरातील जनतेचा भरपूर सहकार्य मिळण्याची चर्चा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदुर -
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी उठवल्यानंतर गडचांदुर शहरात अत्यंत मध्यभागी व वर्दळीच्या ठिकाणी असलेले अनेक देशी दारूची दुकाने पुनश्च सुरु झालेली आहेत.बाजारातील अचानक चौकातील दुर्गा माता मंदिर या वर्दळीच्या ठिकाणी श्री गुलाब शेंद्रे यांचे देशी दारू दुकान सुरु असून परिसरात मोठे दुर्गा मातेचे मंदिर असल्याने मातेचे दर्शनासाठी महिला व पुरुषांची सारखे येणे जाणे सुरू असते. विशेष करून संध्याकाळच्या वेळी मंदिरात जाण्याआधी बेवड्यांचे दर्शन घडते. लागुनच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक असल्याने सामान्य शेतकरी, शिक्षक, निराधार महिला व विद्यार्थ्यांची मोठी ये-जा सुरू असते. या ठिकाणी तडीरामांमुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना, बँकेचे ग्राहकांना व परिसरातील रहिवासीयांना मोठा त्रास होत आहे. विद्यार्थी मुली व महिलांना परिसरात असलेल्या बँक, मंदिर, दवाखाना व इतर दुकानात येणे कठीण होत चालले आहे व त्यांची छेड़-छाड होण्याची भीती नेहमी लागलेली असते. परिसरात असलेल्या प्रतिष्ठित डॉक्टरांचे दवाखान्यात, मोठी कपड्यांचे दुकानात येणाऱ्या ग्राहकांना व  व्यापारी बांधवाना याचा मोठा त्रास सुरू झाला आहे.
त्याचप्रमाणे बस स्थानकाजवळ असलेल्या स्टेट बँक आफ इंडिया जवळ श्री रऊफ खान व इतर यांचे देशी दारू दुकान आहे. शहरात एकमेव राष्ट्रीयकृत बँक असल्याने शहरातील महिला, विद्यार्थी, शेतकरी व नोकरदार ग्राहकांची मोठी गर्दी बँकेत होत असते. सदर दारू दुकानामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. बँकेचे परिसरात छेडखाणीचे प्रकार मोठ प्रमाणात वाढले आहे. यावर अंकुश लावणे आता गरजेचे झाले आहे.तसेच राजीव गांधी चौक येथील श्री भाऊराव रणदिवे यांची दुकाने पुन्हा सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात होत आहेत. त्यामुळे शहरातील मध्यभागी असलेले दारू दुकाने येथून हटवून शहराच्या बाहेर नेण्यात यावे अशी मागणी भीम आर्मी तर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन भिम आर्मीचे जिल्हा प्रमुख जितेंद्र डोहणे, जिल्हा उपप्रमुख मदन बोरकर व इतर नागरीकांच्या उपस्थीतीत निवासी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या मागणीला शहरातील जनतेचा भरपूर सहकार्य मिळत असल्याने या बद्दल सर्वत्र चर्चा होत असल्याची चित्र दिसत आहे. ह्या मागणीवर आता प्रशासन काय कारवाई करते या वर येथील जनतेचे लक्ष लागले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top