- ईपीएस 95 च्या पेंशनर्सला एकजुट होऊनच मिळविता येईल आपला हक्क - कमांडर अशोक राऊत
- चंद्रपूर येथे पेंशनर्स चा विदर्भस्तरीय मेळावा संपन्न
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
देशात 65 लाख ईपीएस 95 पेंशनर्स आहेत या सर्वांना अत्यल्प पेंशन मिळते. त्यांना हक्काची 7500 रूपये पेंशन व महागाई भत्ता मिळवून देण्यासाठी सर्व पेंशनर्स नी एकत्रित येऊन लढा दिला तरच हक्क मिळू शकेल असे मत ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी व्यक्त केले. चंद्रपूर येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित ईपीएस 95 पेंशनर्सच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. 2017 पासून राष्ट्रीय संघर्ष समिती पेंशनर्स च्या पाठीशी उभी आहे. विविध आंदोलने, मेळावे, निदर्शने केली परंतू शासन मात्र दाद देत नाही. आता एकत्रित येत हा संघर्ष तिव्र करणे गरजेचे आहे. त्याकरीता येत्या 19 डिसेंबर रोजी लखनऊ येथे होणाऱ्या राष्ट्रीय मेळाव्यास उपस्थित राहून आपली शक्ती दाखवीण्याचे आवाहन त्यांनी केले.
ईपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या वतीने येथील मातोश्री मंगल कार्यालयात विदर्भस्तरीय मेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय संघर्ष समिती बुलढाणा चे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा कोशीयारी समिती चे माजी सदस्य हंसराज अहिर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुख्य समन्वयक विलास पाटील, कार्यकारीणी सदस्य जे.जे. गर्कल नाना, उपकोषाध्यक्ष बी.एस. नारखेडे, चिखली तालुका अध्यक्ष डि.आर. साळोख, पश्चीम भारत महिला संघटन सचिव सौ. नारखेडे ताई, जेष्ठ कार्यकर्ते जे.जी. मच्छले, वसंतराव शिकारे, सुभाष शहा, कुसुमताई उदार, छत्तीसगड येथील रहेमान चाचा, नरेंद्र गाडगे, एस.एम. तायडे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष परशुराम तुंडूलवार, उपाध्यक्ष आर. के. मुसळे, जिल्हा सचिव दयाशंकर सिंग, सहसचिव अरूण जमदाडे, कार्याध्यक्ष पुरूषोत्तम राऊत, चंद्रपूर तालुका अध्यक्ष दिपक जोगी, बल्लारपूर तालुका अध्यक्ष पुंडलीक मोहूर्ले, गोंडपिपरी तालुका अध्यक्ष बारीकराव कुसनाके, पोंभूर्णा तालुका अध्यक्ष व्ही. पी. सिडाम, चंद्रपूर तालुका अध्यक्ष रविंद्र सोनडवले, राजुरा तालुका अध्यक्ष मनोहर टाके, कार्याध्यक्ष अरूण लांडे, सचिव कवडू डेरकर, गडचिरोली जिल्हाध्यक्ष गोविंद सावसागडे, जिल्हा सचिव भास्कर नागतोडे उपस्थित होते.
संघर्ष समितीच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री सितारामण, श्रममंत्री यांची भेट घेऊन वस्तुस्थीती समजावून सांगीतल्यानंतर यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहे.
या मेळाव्यात चंद्रपूर जिल्हृयात अधिक सभासद करणारे व देणगी गोळा करणारे समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आर.के. मुसळे व दिपक जोगी यांचा विशेष सत्कार कमांडर अशोक राऊत यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दयाशंकर सिंग यांनी केले. संचालन अरूण जमदाडे व उपस्थितांचे आभार पुरूषोत्तम राऊत यांनी मानले. कार्यक्रमाला पी. झेड. शेंडे, कापसे, दौलत साटोने, सुभाष शहा, भजनदास जांगडे, आनंदराव ताजने, प्रभाकर मांडवकर, देवराव आसुटकर, मधुकर ईंगळकर, डॅनियल जोसेफ, कविशवर कंठीवार, प्रभाकर भांगरे, मारोती राचलवार, सुधाकर सोयाम, विजय त्रीनगरीवार, वासुदेव झाडे, बक्षी साहेब, वामन दुपारे, कोंडाजी रायपुरे, मेघराज पिंपळशेंडे सह चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील ईपीएस 95 पेंशनर्स मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.