- गत 24 तासात 97 कोरोनामुक्त
- आतापर्यंत 23,846 जणांची कोरोनावर मात
- ॲक्टीव पॉझिटिव्ह 1011
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 25 हजार 264 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 846 झाली आहे. सध्या 1011 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 40 हजार 610 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 12 हजार 252 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये अरविंद नगर, चंद्रपूर येथील 67 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 407 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 368, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 136 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 53, चंद्रपूर तालुका 12, बल्लारपूर आठ, भद्रावती 14, ब्रम्हपुरी 11, नागभिड आठ, सिंदेवाही तीन, मूल तीन, सावली दोन, राजुरा एक, चिमूर सात, वरोरा चार, कोरपना एक व इतर ठिकाणच्या नऊ रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.