- दोन जिवंत काडतुसे हि मिळाली
बल्लारपुर -
गुरुवार दि. 18 मार्चच्या रात्री पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की शहरातून हद्दपार केलेला तडीपार येदुराज उर्फ रामनरेश आरक (बच्ची यादव) रा. सुभाष वॉर्ड, बल्लारपूर हा आरोपी कमरेला देशी कट्टा (पिस्तूल) खोसून फिरत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच ठाणेदार उमेश पाटील आपले सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन वस्ती विभाग सर्च करून मोठया शिफातीने रात्री एक वाजताच्या दरम्यान बच्ची उर्फ येदुराज वय 29 व साथीदार फारुख ऐय्याश शेख रा. बालाजी वॉर्ड दोघांना मोटारसायकल वर फिरत असतांना ताब्यात घेतले व झडती घेतली असता त्यांचा कडून कमरेला खोसलेली देशी कट्टा पिस्तूल व साथीदार फारुख याचा खिशात दोन जिवंत काडतुसे मिळाली दोघांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. दोघांवरही कलम 425 भारतीय हत्यार कायदा व 142 महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी वेळेवरच सतर्कता दाखवून मोठा अनर्थ टाळला. ही कारवाई ठाणेदार उमेश पाटील, API गायकवाड, API मुलाणी, PSI टेंभुर्णें, PSI चांदोरे, नापोशी सतीश पाटील, शरद कुडे, सीमा कोरते, विशिष्ट रंगारी यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.