- २६ मार्च पासून खदान बंद आंदोलन
- सास्ती - कोलगांव येथील संतप्त प्रकल्पग्रस्तांचा इशारा
धोपटाला प्रोजेक्ट करिता २०१२ मध्ये सेक्शन लागू करण्यात आला होता २०१५ मध्ये सेक्शन पुर्णत्वात आला. ९ वर्षे झाली तरी जमिनीचा मोबदला नाही तर नोकरीही नाही अशी अवस्था शेकडों प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. रेंगाळलेल्या या प्रोजेक्टचा मोबदला न मिळाल्यामुळे कुटुंबियांचे पालन-पोषण, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न कसे उरकवावे असा प्रश्न प्रकल्पग्रस्तांसमोर उभा ठाकला आहे.
जमिनीचा मोबदला व नोकरी संदर्भात विचारपूस करण्याकरिता महाप्रबंधक कार्यालयात प्रकल्पग्रस्त जात असता कार्यालय अधिकारी उद्धट भाषेत उडवा उडवीची उत्तरे देतात असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी लावला आहे. २६ मार्च पर्यंत मोबदला व नोकरी संदर्भात निर्णय न झाल्यास सास्ती येथील कोळसा खदानीचे काम पूर्णतः बंद पाडण्याचा इशारा कोलगावचे सरपंच अनिता सुधाकर पिंपळकर, उपसरपंच पुरुषोत्तम लांडे, सास्ती चे सरपंच रमेश पेटकर, उपसरपंच कुणाल कुडे, प्रकाश भटारकर, किशोर कुडे, विलास घटे, प्रभाकर नळे, विलास भटारकर व शेकडो धोपटाला, सास्ती व कोलगांव येथील प्रकल्पग्रस्तांनी दिला आहे.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.