- एकाने प्यायले हार्पिक ; दुसर्याने घेतली फाशी
बल्लारपुर -
बल्लारपूरात बुधवारी सायंकाळी दोन वेगवेगळ्या वॉर्डात दोन तरुणांनी आपले आयुष्य संपवून संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. बालाजी वॉर्डचे नगर सेवक स्व.नरसैय्या एंगन्दुलावार यांच्या आजारामुळे झालेल्या मृत्यूमुळे विरह सहन न झाल्यामुळे त्यांचा मुलगा राजू राजू नरसैयया एंनगन्दुलावार वय 28 यांनी घराच्या बाथरूममध्ये हार्पिक पिऊन आत्महत्या केली.
तर रविंद्र वार्डात रात्री दहा वाजता आपल्या आईला घराच्या वरच्या खोलीत झोपायला चाललो म्हणत, वरचा खोलीत झोपायला गेलेल्या शुभम राजू बहुरिया वय 26 यांने घराच्या वरच्या खोलीत दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटनेची माहिती दुसर्या दिवशी सकाळी आठ वाजता समोर आली. बल्लारपूर पोलिस दोन्ही घटनांचा तपास करीत आहेत.


टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.