- भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या शिष्ट मंडळाने घेतली महावितरण अधिकाऱ्यांनची भेट
चंद्रपूर -
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या शिष्टमंडळाने आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचने नुसार भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात बाबूपेठ येथील महावितरणच्या कार्यालयातील मुख्य अभियंता देशपांडे यांची भेट घेतली. यावेळी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी भ्रमणध्वनीवर मुख्य अभियंता देशपांडे यांना विज ग्राहकांना वीज देयके भरण्यासाठी 12 टप्प्याची सवलत उपलब्ध करून देऊन या योजनेच्या प्रसिद्धी साठी महावितरण विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात यावे अशी दिली. यावेळी मुख्य अभियंता देशपांडे यांनी या योजनेची माहिती व प्रसिद्धी नागरिकांन पर्यंत पोहचविण्यासाठी महावितरण विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले. यावेळी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या शिष्टमंडळात मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे, नगरसेवक प्रदीप किरमे, भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू, भाजपा सचिव चांदभाई पाशा, अमोल नगराळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.