- सर्वांनी लसीचा लाभ घेण्याचे सीजीएम सब्यसाची डे यांचे आवाहन
यावेळी झालेल्या लसीकरण शुभारंभ कार्यक्रमाचे उदघाटन क्षेत्रीय महाव्यवस्थापक सब्यसाची डे यांनी ही लस सुरक्षित तसेच मोफत दिली जात असून वेकोलिच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तसेच कुटुंबियांनी ऑनलाईन नोंदणी करून लस घेण्याचे आवाहन केले. क्षेत्रीय वैद्यकिय अधिकारी डॉ. ओवेस अली यांनी कोविद 19 च्या लसीकरणा विषयी सविस्तर माहिती दिली.
या शुभारंभ कार्यक्रमाला महाव्यवस्थापक (संचालक) सी. पी. सिंह, क्षेत्रीय कार्मिक व्यवस्थापक समीर बारला, डॉ. चंद्रशेखर, डॉ. जगदीश, कढोली प्राथमिक स्वास्थ केंद्राचे डॉ. विपीन कुमार ओदेला, बोडाराम रघु आणि त्यांची संपूर्ण टीम, क्षेत्रीय कल्याण समिती सदस्य विवेक अल्लेवार, शिरपूरम रामलू, पी.बी. पाटील, रामचंद्र, मीडिया प्रभारी सूरज इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मेट्रन शशी मसीह यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने वैद्यकीय कर्मचारी व कामगार उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.