Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: सार्वजनिक वितरण व्यवस्था - दक्षता समितीची बैठक संपन्न
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नागरिकांना वेळेवर व विना तक्रार धान्याचा पुरवठा करा - सुभाष धोटे अनिल गंपावार - आमचा विदर्भ प्रतिनिधी राजुरा - राजुरा तालुक्यातील सर्व तालुक...

  • नागरिकांना वेळेवर व विना तक्रार धान्याचा पुरवठा करा - सुभाष धोटे
अनिल गंपावार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
राजुरा तालुक्यातील सर्व तालुकास्तरीय व नगरपालिका क्षेत्र स्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था दक्षता समितीची सभा आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, पंस सभापती मुमताज जावेद, तहसीलदार हरीश गाडे, संवर्ग विकास अधिकारी डॉ. ओमप्रकाश रामावत यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी आमदार धोटे यांनी नागरिकांना वेळेवर व विना तक्रार धान्याचा पुरवठा करण्यासंबंधी सूचना अन्न पुरवठा विभाग व स्वस्त धान्य दुकानदारांना दिल्या. 

रास्त भाव दुकानदार व समिती सदस्य यांनी मौखिक समस्या सुभाष धोटे यांच्यासमोर मांडल्या. आलेल्या समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना अन्न पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यावेळी तालुक्यात एकूण 108 रास्तभाव दुकाने कार्यान्वित असून शिधापत्रिकांमध्ये पूर्ण शंभर टक्के आधार कार्ड संगणकीकरण झाले असल्याची माहिती सांगण्यात आली. सभेत अन्न पुरवठा विभागाच्या निरीक्षक अधिकारी सविता गंभीरे, पुरवठा निरीक्षक विकास राजपूत, नरेंद्र खांडेकर, मिलिद कांबळे, धनराज गेडाम यांचेसह इतर सहकारी उपस्थित होते. 



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top