- गत 24 तासात 85 कोरोनामुक्त
- आतापर्यंत 23,665 जणांची कोरोनावर मात
- ॲक्टीव पॉझिटिव्ह 895
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 964 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 665 झाली आहे. सध्या 895 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 35 हजार 19 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख सात हजार 769 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज मृत झालेल्यामध्ये निलजई ता.वरोरा येथील 80 वर्षीय पुरूष व चामोर्शी येथील 62 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 404 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 365, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज बाधीत आलेल्या 121 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 60, चंद्रपूर तालुका 13, बल्लारपूर 11, भद्रावती आठ, ब्रम्हपुरी एक, नागभिड तीन, मूल दोन, सावली एक, गोंडपिपरी तीन, राजुरा दोन, चिमूर पाच, वरोरा दोन, कोरपना नऊ व जीवती येथील एका रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.