आमचा विदर्भ - दीपक शर्मा
भद्रावती / चंद्रपूर (दि. ३ ऑक्टोबर २०२६) -
चंद्रपूर जिल्ह्यात व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या संकल्पनेतून संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने भद्रावती येथे पत्रकार संवाद बैठक उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. पत्रकारांच्या स्थानिक समस्या, संघटनेविषयी अपेक्षा आणि आगामी संघटनात्मक वाटचालीवर यावेळी चर्चा करण्यात आली.
वृंदावन सेलिब्रेशन हॉल येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अनिल बाळसराफ होते. यावेळी डिजिटल मीडिया विंग जिल्हाध्यक्ष आशिष रैच, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दीपक शर्मा, राजुरा तालुकाध्यक्ष गणेश बेले उपस्थित होते. प्रास्ताविक जेष्ठ पत्रकार राजेश रेवते यांनी केले.
व्हॉईस ऑफ मीडिया चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने सुरू असलेल्या ‘पत्रकार जोडो अभियानांतर्गत’ हा संवाद आयोजित करण्यात आला. पत्रकारांच्या प्रश्नांवर संघटितपणे पाठपुरावा करण्यासाठी सक्षम संघटनात्मक रचना उभारण्यावर यावेळी भर देण्यात आला.
बैठकीस लिमेश माणूसमारे, निलेश नवराते, सुरेंद्र चव्हाण, रवी भोगे, चैतन्य कोहळे, रवी कुडुदुला, किशोरीकांत चौधरी, अनिल इंगोले, संदीप जीवने, बबलू उर्फ वीरेंद्र कुमार राय, विनायक येसेकर, जावेद बब्बू शेख, दिलीप मांढरे, विजेंद्र वानखेडे, राजू गैनवार आणि अतुल कोल्हे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
राज्याध्यक्ष नरेंद्र देशमुख व विभागीय अध्यक्ष व्यंकटेश डुडमवार यांच्या सूचनेनुसार भद्रावती तालुक्यातील सदस्यांची पडताळणी करून तालुका कार्यकारिणीची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. पत्रकारांच्या हितासाठी संघटनात्मक एकजूट मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
#व्हॉईसऑफमीडिया #VoiceOfMedia #चंद्रपूर #चंद्रपूरबातम्या #भद्रावती #भद्रावतीबातम्या #पत्रकार #पत्रकारसंघटना #पत्रकारजोडोअभियान #पत्रकारांच्याप्रश्नांसाठी #पत्रकारहित #चंद्रपूरपत्रकार #भद्रावतीपत्रकार #महाराष्ट्रपत्रकार #पत्रकारएकजूट #पत्रकारकल्याण #ChandrapurNews #BhadravatiNews #VoiceOfMediaMaharashtra #JournalistAssociation #MaharashtraJournalists

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.