Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजुरा पोलिसांकडून चोरीची बुलेट जप्त; वर्ध्यातील तरुणाला अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चुनाळा येथून चोरीला गेलेली रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल हस्तगत; १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा – 16 सप्टें...
चुनाळा येथून चोरीला गेलेली रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल हस्तगत; १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा – 16 सप्टेंबर 2026
        चुनाळा येथून चोरीला गेलेल्या रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकलचा राजुरा पोलिसांनी तपास लावत एका संशयित आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून चोरीची मोटारसायकल जप्त केली असून, तिची अंदाजे किंमत 1 लाख रुपये आहे.

         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल क्रमांक MH 34 AX 1120 ही दि. 12ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11 वाजेपासून ते दि. 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास चुनाळा येथील घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरी केली. मोटारसायकलची अंदाजे किंमत 1 लाख रुपये असून, याप्रकरणी राजुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

        पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तलोडी (कुटकी), ता. सेलू, जि. वर्धा येथील अनुराग प्रविण धाबर्डे (वय 21) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड क्लासिक मोटारसायकल क्रमांक MH 34 AX 1120 जप्त केली आहे. सदर मोटारसायकलची अंदाजे किंमत 1 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी राजुरा पोलिस ठाणे अप. क्र. 713/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजुरा पोलिसांकडून सुरू आहे.

        ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनी लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ. शफीक शेख, मिलिंद जांभुळे, महेश बोलगोडवार, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

#Rajura #RajuraNews #RajuraPolice #Chandrapur #ChandrapurNews #RajuraCrime #CrimeNews #BulletBike #RoyalEnfield #RoyalEnfieldClassic #BikeTheft #BikeTheftCase #PoliceAction #MaharashtraPolice #ChandrapurPolice #RajuraCrimeNews #Chunala #Wardha #WardhaNews #CrimeUpdate #PoliceInvestigation #MotorcycleTheft #चोरीचीबुलेट #बुलेटचोरी #राजुरापोलीस #राजुरान्यूज #चंद्रपूर #चंद्रपूरन्यूज #गुन्हेवार्ता #पोलीसकारवाई #मोटारसायकलचोरी

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top