Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धनगर समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी राजुरातून शासनाला साकडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आरक्षणासह चार प्रमुख मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांकडे आमचा विदर्भ - अनंता गोखरे  राजुरा (दि. ०८ सप्टेंबर २०२६) -         महाराष्ट्रातील ...
आरक्षणासह चार प्रमुख मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदारांकडे
आमचा विदर्भ - अनंता गोखरे 
राजुरा (दि. ०८ सप्टेंबर २०२६) -
        महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजुरा धनगर समाजाच्या वतीने आज स्थानिक तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. नायब तहसीलदार तेलंग यांनी निवेदन स्वीकारले. धनगर आरक्षणासह समाजाच्या विविध महत्त्वपूर्ण मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

        धनगर समाजाच्या निवेदनातील प्रमुख मागणी धनगर आरक्षणाशी संबंधित आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली विशेष अनुज्ञा याचिका महाराष्ट्र शासनाने पूर्ण ताकदीने आणि गांभीर्याने लढावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ८ सप्टेंबर २०२६ पूर्वी धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ ठोस, सकारात्मक तसेच सर्व कायदेशीर व घटनात्मक बाबी स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

        तसेच या प्रकरणात धनगर समाजाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी शासनाने अनुभवी आणि सक्षम वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. धनगर ST आरक्षणाबाबत कोणताही प्रतिकूल निर्णय झाल्यास समाजातील पात्र व्यक्तींना ST प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासनाने पर्यायी ‘प्लॅन बी’ तयार ठेवावा, अशी मागणी करण्यात आली.

संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायद्याची मागणी
        श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी विशेष शासकीय कायदा करण्यात यावा, अशी मागणीही धनगर समाजाने केली आहे. देवस्थानच्या विश्वस्त मंडळामध्ये किमान २१ विश्वस्त असावेत तसेच अध्यक्षपद धनगर समाजातील व्यक्तीस देण्यात यावे, अशी भूमिका निवेदनातून मांडण्यात आली.

मिसिंग लिंकला शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी
        मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील Missing Link ला स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. समाजाच्या ऐतिहासिक योगदानाची दखल घेत या प्रकल्पाला शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली.

चर्चगेट रेल्वे स्थानकाचे अहिल्यादेवी होळकर नामकरण
        मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी आणखी एक प्रमुख मागणी निवेदनातून करण्यात आली. या मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन धनगर जमातीला न्याय द्यावा, अशी विनंती करण्यात आली.

        निवेदन देताना राजुरा धनगर समाजाचे अध्यक्ष गोपाळराव बुरांडे, एकनाथ खडसे, राजुरा धनगर समाजाचे माजी अध्यक्ष विठ्ठल येवले, अनंता गोखरे, मधुकर गाडगे, बंडू पोतले, संतोष दवडे, बाळू कापडे, दिनेश पोतले, दशरथ धवने, सुभाष चिडे यांच्यासह इतर समाजबांधव उपस्थित होते.

#DhangarSamaj #DhangarReservation #DhangarSTReservation #DhangarCommunity #Rajura #RajuraNews #Chandrapur #ChandrapurNews #MaharashtraNews #DhangarAarakshan #SantBalumama #AhilyadeviHolkar #ShingrobaDhangar #Churchgate #MumbaiPuneExpressway #RajuraDhangarSamaj #MaharashtraNews #VidarbhaNews #AamchaVidarbha

About Author

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top