आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०८ सप्टेंबर २०२६) -
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजुरा शहरासह पोलीस उपविभाग राजुरा अंतर्गत येणाऱ्या परिसरात शांतता, सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. याच अनुषंगाने आज 8 सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा कुमार सुशांत यांनी राजुरा शहरातील गणेश विसर्जन स्थळाला भेट देऊन मिरवणूक मार्गाची पाहणी केली. गणेश विसर्जनाच्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये, वाहतूक व गर्दीचे नियोजन सुरळीत राहावे तसेच नागरिकांना सुरक्षित वातावरणात उत्सव साजरा करता यावा, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
दरम्यान, गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस उपविभाग राजुरा अंतर्गत पोलीस ठाणे राजुरा, बल्लारपूर, कोठारी, विरूर, धाबा आणि लाठी यांच्या वतीने ओम साई लॉन, राजुरा येथे शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला शांतता समितीचे सदस्य, पोलीस पाटील, डीजे चालक व मालक, गणेश मंडळांचे पदाधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, स्थानिक व्यापारी, पत्रकार तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी गणेशोत्सव हा शांतता, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाने साजरा करण्याचे आवाहन केले. सर्व समाजबांधवांनी एकोप्याने सण-उत्सव साजरे करावेत, कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. अनुचित प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले.
शांतता समितीचे बैठकीस पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा कुमार सुशांत, राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे, राजुरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रज्ञाशिल वाघमारे, मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपुर, महावितरणचे राजुरा अभियंता परचाके, महावितरणचे बल्लारपुर अभियंता कातकर, कनिष्ठ अभियंता हेमंत मानापुरे, राजुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर, बल्लारपुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विपीन इंगळे, विरुर पोलीस स्टेशनचे स.पो.नि. गायकवाड, कोठारी पोलीस स्टेशनचे ठाणेदार खरसान, स.पो.नि. हेंमत पवार, उप पो.स्टे. धाबा ईत्यादी प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स.पो.नि. लक्ष्मण लोकरे पो.स्टे. राजुरा यांनी केले असुन आभार प्रदर्शन श्री. विपीन इंगळे, पोलीस निरीक्षक पो.स्टे. बल्लारपुर यांनी केले आहे.
गणेश मंडळांनी मिरवणूक व विसर्जनाच्या वेळी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, डीजेच्या वापराबाबतच्या सूचनांचे पालन करावे तसेच कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण लोकरे, पोलीस ठाणे राजुरा यांनी केले. तर आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक विपीन इंगळे, पोलीस ठाणे बल्लारपूर यांनी केले.
गणेशोत्सवाच्या काळात राजुरा शहर आणि परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, नगर परिषद, वीज विभाग तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि नागरिक यांच्यात समन्वय राखण्यावर बैठकीत भर देण्यात आला. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे.
#Rajura #RajuraNews #RajuraPolice #GaneshUtsav #Ganeshotsav2026 #GanpatiFestival #GanpatiVisarjan #Chandrapur #ChandrapurNews #RajuraGaneshotsav #GaneshVisarjan #PeaceCommittee #LawAndOrder #PoliceAdministration #GanpatiBappa #VidarbhaNews #MaharashtraNews #GaneshFestival #RajuraGanpati #AamchaVidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.