Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: डीजे वाजविण्यापूर्वीच पोलिसांची कारवाई; 12.60 लाखांचे साहित्य जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 14 सप्टेंबर 2026) -         सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोठ्या ...
नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 14 सप्टेंबर 2026) -
        सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोठ्या आवाजात डीजे साउंड सुरू करण्याच्या तयारीत असलेल्या डीजेवर राजुरा पोलिसांनी कारवाई केली. राजुरा येथील नवीन बसस्थानकासमोर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत डीजेचे विविध साहित्य, जनरेटर, मिक्सर आणि महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण सुमारे 12 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

        दिनांक 14 सप्टेंबर 2026 रोजी सपोनि लक्ष्मण लोकरे हे डीबी स्टॉप पोस्टे येथे हजर असताना राजुरा येथील नवीन बसस्थानकासमोर डीजे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH-34-BZ-5017 मध्ये डीजे साउंड लावून तो वाजविण्याची तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी डीजे वाजविण्याच्या परवान्याबाबत संबंधितांकडे विचारणा केली. त्यावेळी कोणत्याही प्रकारचा वाद्य परवाना नसल्याचे सांगण्यात आल्याने पोलिसांनी नियमाप्रमाणे कारवाई केली. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोठ्या आवाजात डीजे साउंड सुरू करण्याची तयारी केल्याप्रकरणी डीजे मालक व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन अप क्र. 730/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 38, 136 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

        या कारवाईत डीजे मालक रवि सतिश एकनकर, वय 28 वर्षे, व्यवसाय डीजे मालक/ऑपरेटर आणि वाहन चालक सचिन इन्चुलाल सरोज, वय 22 वर्षे, व्यवसाय ड्रायव्हर दोन्ही राहणार बल्लारशाह यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये डायनॉटिक कंपनीचे 2 साउंड टॉप, क्रीश कंपनीचे 4 साउंड बेस, क्राउन कंपनीची 1 मशीन, किर्लोस्कर कंपनीचा 1 जनरेटर, कॉईनर कंपनीचा 1 मिक्सर तसेच महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH-34-BZ-5017 यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 12 लाख 60 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

         गणेशोत्सव, धार्मिक कार्यक्रम तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिक्षेपक व डीजेच्या वापराबाबत असलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना मोठ्या आवाजात डीजे साउंड सुरू करून शासनाच्या आदेशांचे किंवा लागू नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

        ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार सुशांत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक नितिन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ. शफीक शेख, मिलिंद जांभुळे, रमेश बस्सी आणि राजीव दुबे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

#Rajura #RajuraNews #RajuraPolice #Chandrapur #ChandrapurNews #RajuraLatestNews #DJAction #DJNews #DJSound #DJPoliceAction #MaharashtraPolice #ChandrapurPolice #CrimeNews #BreakingNews #MaharashtraNews #VidarbhaNews #AamchaVidarbha #राजुरा #राजुराबातम्या #चंद्रपूर #चंद्रपूरबातम्या

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top