ग्राहकांना संयम राखण्याचे यहोवा यिरे संस्थेचे आवाहन
अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क ठेवून सहकार्य करण्याचे ग्राहक व कर्मचाऱ्यांना आवाहन
आमचा विदर्भ - वृत्तसेवा
चंद्रपूर, दि. १८ जुलै २०२६
यहोवा यिरे संस्थेबाबत सोशल मीडियावर प्रसारित होत असलेल्या विविध माहिती आणि व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही अप्रमाणित माहितीवर अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन संस्थेचे डायरेक्टर व सीईओ डॉ. रमेश कुमार यांनी केले आहे. ग्राहकांच्या हिताचे संरक्षण आणि प्रलंबित रकमेच्या परतफेडीसाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
डायरेक्टर व सीईओ डॉ. रमेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारातील कर्जवसुली अपेक्षित गतीने व वेळेत होत नसल्यामुळे संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर आणि रोख प्रवाहावर परिणाम झाला आहे. त्यामुळे काही ग्राहकांच्या मुदतपूर्तीच्या ठेवी व विड्रॉलच्या रकमा देण्यास विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांकडून आर्थिक व्यवहारांमध्ये कथित अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करत संबंधित प्रकरणांची चौकशी सुरू असून, आवश्यक ती प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
या आर्थिक परिस्थितीमुळे काही ग्राहकांना परतफेडीमध्ये विलंब होत असला तरी संस्था कोणत्याही ग्राहकाची जबाबदारी टाळत नसल्याचे डॉ. रमेश कुमार यांनी स्पष्ट केले. थकीत कर्जवसुली प्रभावीपणे पूर्ण करून आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर उपलब्ध निधीनुसार ग्राहकांच्या सर्व प्रलंबित रकमा टप्प्याटप्प्याने अदा करण्यासाठी संस्था प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
या संदर्भात १५ मे २०२६ रोजी कुणबी समाज भवन, चंद्रपूर येथे ग्राहक व कर्मचाऱ्यांची आमसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत संस्थेची सद्यस्थिती, आर्थिक अडचणी आणि पुढील नियोजन याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कर्जवसुली पूर्ण करून आर्थिक परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी आणि ग्राहकांच्या परतफेडीची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी सुमारे सहा ते सात महिन्यांचा कालावधी मागण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात लेखी हमीपत्र देऊन नोटरीद्वारे दस्तऐवजीकरण करण्यात आल्याची माहितीही व्यवस्थापनाने दिली.
दरम्यान, काही व्यक्तींनी संस्थेच्या कार्यालयात येऊन व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोप व्यवस्थापनाने केला आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओ किंवा संदेशांची सत्यता पडताळल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये किंवा ते पुढे प्रसारित करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
डायरेक्टर व सीईओ डॉ. रमेश कुमार यांनी सांगितले की, संस्थेसमोर निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी व्यवस्थापन सातत्याने प्रयत्न करीत आहे. थकीत कर्जांची वसुली, कथित अनियमिततेची चौकशी आणि आर्थिक व्यवहार पूर्ववत करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. ग्राहकांनी संयम राखून सहकार्य करावे आणि कोणतीही माहिती जाणून घेण्यासाठी संस्थेच्या अधिकृत प्रतिनिधींशी थेट संपर्क साधावा, असे त्यांनी आवाहन केले.
#JehovahYire #CustomerUpdate #FinancialUpdate #CustomerAwareness #FactCheck #SocialMediaAwareness #MaharashtraNews #VidarbhaNews #ChandrapurNews #CustomerInterest #OfficialStatement #BreakingNews #InvestmentAwareness #LatestNews #aamchavidarbha #vidarbha

येहवा यिरे बँकेच्या संस्थापक म्हणजे रमेश बोरकुठे यांनी 18 जुलै
उत्तर द्याहटवाया तारखेला जी काही बातमी प्रसारित केली त्यात खरच तथ्य आहे का?
जानेवारी महिन्यापासून ते 18 जुलै पर्यंत फक्त बँकेकडून सतत वेळ काढून घेण्याचा प्रयत्न
करण्यात आला आहे.
आज पर्यंत या बँक कडून कुठ्ल्याही ग्राहकांचे गुंतवणूक केलेली रक्कम परत केली
नाही.
20 एप्रिल 2026 ते 10 मे 2026 या कालावधीत गुंतवणूक केलेली रक्कम परत करण्यात येईल
असे स्टॅम्प पेपर वर नोटरी करून देण्यात आली होती.
नंतर 15 मे 2026 या तारखेला पुन्हा स्वतःच स्टॅम्प पेपर नोटरी करून लिहून दिला आहे की
15 मे 2026 पासून पुढील सहा महिन्यात गुंतवणूक केलेली रक्कम परत करण्यात येईल.
आज दोन महिने झाले एकही रुपया कुणालाही देण्यात आलेला नाही.